Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रतन टाटांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत माहितीये का? साधेपणा पाहून भारावून जाल…

प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. टाटा यांचे निधन होऊन २ दिवस उलटले. मात्र, अजूनही त्यांच्याविषयीची चर्चा थांबायला तयार नाही. याच पार्श्वभुमीवर आज आपण कोट्यवधींची संपत्ती असलेल्या रतन टाटा यांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमतीबाबत जाणून घेणार आहोत...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 13, 2024 | 09:20 PM
रतन टाटांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत माहितीये का? साधेपणा पाहून भारावून जाल...

रतन टाटांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत माहितीये का? साधेपणा पाहून भारावून जाल...

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. टाटा यांचे निधन होऊन २ दिवस उलटले. मात्र, अजूनही त्यांच्याविषयीची चर्चा थांबायला तयार नाही. रतन टाटा यांच्या सेवाभावी आणि साध्या जीवनाबद्दल सर्वजण बोलत आहेत. याच पार्श्वभुमीवर आज आपण कोट्यवधींची संपत्ती असलेल्या रतन टाटा यांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमतीबाबत जाणून घेणार आहोत…

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाज उभारणीच्या कामातही रतन टाटा यांचे योगदान मोठे आहे. रतन टाटा हे भारताचा अभिमान होते. रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी जगाचा निरोप घेतला. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली. रतन टाटा हे महान परोपकारी व्यक्तींपैकी एक होते.

3800 कोटींची संपत्ती

अत्यंत साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेल्या रतन टाटांकडे इतर अब्जाधीशांच्या तुलनेत खूपच कमी संपत्ती होती. कारण रतन टाटा यांनी आपली बहुतेक संपत्ती दान केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांच्याकडे अंदाजे 3800 कोटी रुपयांची संपत्ती आणि काही आलिशान कार होत्या. यासोबतच त्यांच्याकडे एक आलिशान घर आहे.

हे देखील वाचा – रतन टाटा यांनी झिरोपासून हिरो बनवलेल्या 7 कंपन्या; काहींचा परदेशातही आहे डंका!

कितीये घराची किंमत

रतन टाटा हे मुंबईतील कुलाबा परिसरातील आपल्या एका घरात राहत होते. हे घर 14000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेले आहे. रिपोर्ट्सनुसार, या आलिशान घराची किंमत जवळपास 150 कोटी रुपये आहे. म्हणजेच देशातील अनेक सेलिब्रेटींच्या घरांपेक्षा ही किंमत कमी आहे. रतन टाटा यांच्या या आलिशान घरात स्विमिंग पूल, अनेक रूम्स, सन डेस्क, बार आणि लाऊंज अशा अनेक सुविधा आहेत.

साधेपणा असलेली घराची रचना

रतन टाटा यांच्या साध्या स्वभावानुसार त्यांनी आपल्या घराची रचना केली होती अशी माहिती समोर आली आहे. हे घर बाहेरून सुद्धा खूपच भव्य दिसते. टाटा समूहाचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. स्वयंपाकघरापासून ते आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांपर्यंत टाटा समूहाचे व्यवसाय आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रतन टाटा यांच्याकडे या आलिशान घराच्या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे इतरही मोठी संपत्ती, आलिशान कार कलेक्शन आहे.

Web Title: Ratan tata net worth the price of luxury house in mumbai overwhelmed by the simplicity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 09:20 PM

Topics:  

  • Ratan Tata

संबंधित बातम्या

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत
1

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?
2

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.