Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरबीआयची बॅंक ऑफ महाराष्ट्रावर मोठी कारवाई; …तुमचे तर खाते नाही ना!

देशातील बॅंकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नामांकित बॅंक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रला 1 कोटी 27 लाख 20 रूपये इतका दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 16, 2024 | 08:45 PM
आरबीआयची बॅंक ऑफ महाराष्ट्रावर मोठी कारवाई; ...तुमचे तर खाते नाही ना!

आरबीआयची बॅंक ऑफ महाराष्ट्रावर मोठी कारवाई; ...तुमचे तर खाते नाही ना!

Follow Us
Close
Follow Us:

देशातील बॅंकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँक ऑफ महाराष्ट्र या आघाडीच्या बॅंकेला दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयकडून हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयच्या कर्ज प्रणाली ऑफर डिलिव्हरी ऑफ बँक क्रेडिट, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क इन बँक क्रेडिट आणि केवायसी नियमांबाबत जारी केलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे महाराष्ट्र बॅंकेला 1 कोटी 27 लाख 20 रूपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे.

बॅंकेच्या आर्थिक स्थितीची पाहणी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँक ऑफ महाराष्ट्रच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली. 31 मार्च 2023 पर्यंत करण्यात आलेल्या या पाहणीत महाराष्ट्र बॅंकेने आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर आता आरबीआयने महाराष्ट्र बँकेला नोटीस बजावत, आपल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये, अशी विचारणा केली आहे. तसेच याप्रकरणी बॅंकेने 1 कोटी 27 लाख 20 रूपये इतका दंड आरबीआयकडे जमा करावा, असे निर्देश देखील दिले आहेत.

हेही वाचा – कामावरून काढून टाकणे मस्क यांच्या अंगलट, कर्मचाऱ्याला 5 कोटी भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

काय आहे कारवाईचे कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याबाबत म्हटले आहे की, तथ्यांची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्र बँकेवरील हे आरोप समोर आले आहेत. त्यामुळे आता बॅंकेकडून दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, काही कर्जदारांच्या बाबतीत, मंजूर निधी खेळत्या भांडवलाच्या मर्यादेनुसार पूर्ण केला गेला आहे. याची खात्री करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. जी किमान थकित कर्जाच्या विहित टक्केवारी इतकी आहे. असे कारण देखील कारवाई मागे असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. याशिवाय आरबीआयला अन्य कारणे देखील आढळून आली आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि तिच्या ग्राहक यांच्यात झालेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर निर्णय देणे हा यामागील हेतू नाही. बँकेवर लावण्यात आलेला दंड कोणत्याही पूर्वग्रहाने ठोठावण्यात आलेला नाही, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Web Title: Rbi action against bank of maharashtra a fine of 1 crore 27 lakh 20 rupees was imposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 08:45 PM

Topics:  

  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर
1

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

RBI ने बँका आणि ग्राहकांसाठी कर्जाचे नियम केले सोपे, सुवर्ण कर्जाची व्याप्ती वाढवली
2

RBI ने बँका आणि ग्राहकांसाठी कर्जाचे नियम केले सोपे, सुवर्ण कर्जाची व्याप्ती वाढवली

RBI MPC Meeting: दिवाळीपूर्वी स्वस्त कर्जाची भेट मिळेल का? की ग्राहकांना अजून वाट पाहावी लागेल?
3

RBI MPC Meeting: दिवाळीपूर्वी स्वस्त कर्जाची भेट मिळेल का? की ग्राहकांना अजून वाट पाहावी लागेल?

Gold Price Prediction: सोन्याच्या दरात होणार का बदल? दसरा तोंडावर असताना आरबीआयची बैठक काय संकेत देणार?
4

Gold Price Prediction: सोन्याच्या दरात होणार का बदल? दसरा तोंडावर असताना आरबीआयची बैठक काय संकेत देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.