Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजिटल फसवणूक झाली तरी घाबरू नका! पीडित ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई; RBIचा मोठा प्रस्ताव

सायबर गुन्हेगारांमुळे आपल्या कष्टाचे पैसे गमवावे लागतात. अशा पीडित ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रस्ताव मांडला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 07, 2026 | 07:56 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ
  • एकूण नुकसानीच्या ८५ टक्क्यांपर्यंत भरपाई मिळू शकते
  • नवीन प्रस्ताव कधी लागू केला जाऊ शकतो?
RBI Digital Banking Fraud Compensation: आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार सोपे झाले असले, तरी ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. अनेकदा सामान्य नागरिकांना सायबर गुन्हेगारांमुळे आपल्या कष्टाचे पैसे गमवावे लागतात. अशा पीडित ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, कमी रकमेच्या डिजिटल बँकिंग फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तींना ठराविक प्रमाणात आर्थिक नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे डिजिटल व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होणार आहे.

RBIचं नियोजन

आरबीआयने सादर केलेल्या या नवीन आराखड्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीची डिजिटल फसवणूक झाली, तर त्याला झालेल्या एकूण नुकसानीच्या ८५ टक्क्यांपर्यंत भरपाई मिळू शकते. मात्र, या भरपाईसाठी सरकारने जास्तीत जास्त २५,००० रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, ही भरपाई संबंधित व्यक्तीला आयुष्यात केवळ एकदाच दिली जाईल. याचा अर्थ असा की, जर एखादी व्यक्ती वारंवार डिजिटल फसवणुकीला बळी पडत असेल, तर त्याला प्रत्येक वेळी ही मदत मिळणार नाही. आरबीआयने ६ मार्च रोजी या संदर्भातील सुधारित मसुदा प्रसिद्ध केला असून, सध्या डिजिटल व्यवहारांमधील ग्राहकांच्या जबाबदारीच्या चौकटीचा पुनर्विचार केला जात आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ६ फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीतही या विषयावर सुतोवाच केले होते.

नवीन प्रस्ताव कधी लागू केला जाऊ शकतो?

या प्रस्तावातील तांत्रिक बाबींचा विचार केला तर, भरपाईची रक्कम विभागून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जर एखाद्या ग्राहकाचे नुकसान २९,४१२ रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्याला ८५ टक्के भरपाई मिळणार असेल, तर त्यातील ६५ टक्के वाटा स्वतः आरबीआय उचलणार आहे. उर्वरित १०-१० टक्के रक्कम ग्राहकाची बँक आणि ज्या बँकेत पैसे गेले आहेत (बेनेफिशियरी बँक), त्यांना द्यावी लागेल. जर फसवणुकीची रक्कम २९,४१२ ते ५०,००० रुपयांच्या दरम्यान असेल, तरीही भरपाईची कमाल मर्यादा २५,००० रुपयेच राहील, ज्यामध्ये आरबीआयचा वाटा १९,११८ रुपये असेल. यामुळे बँकांवरही सायबर सुरक्षा कडक करण्यासाठी एक प्रकारे दबाव निर्माण होणार आहे.

भरपाई कशी मिळेल?

हे नवीन नियम १ जुलै २०२६ पासून किंवा त्यानंतर होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांसाठी लागू होण्याची शक्यता आहे. सध्या हा केवळ एक मसुदा (Draft) असून आरबीआयने यावर जनतेची मते आणि सूचना मागवल्या आहेत. कोणताही नागरिक ६ एप्रिल २०२६ पर्यंत या प्रस्तावावर आपली लेखी मते नोंदवू शकतो. डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्याच्या दिशेने आरबीआयने उचललेले हे पाऊल सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक मोठे सुरक्षा कवच ठरणार आहे, ज्यामुळे तांत्रिक फसवणुकीमुळे होणारे आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होईल.

Web Title: Rbi digital banking fraud compensation proposal 85 percent refund rule online fraud victims know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • Bank
  • bank accounts
  • RBI
  • RBI Action
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी  Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!
1

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
2

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
3

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
4

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.