'या' बॅंकेला आरबीआयचा मोठा दणका, केलीये 'ही' कारवाई; ...तुमचे तर खाते नाहीये ना!
बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एचडीएफसी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. बँकेचे आदेश आणि मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्याबद्दल आरबीआयने बँकेला हा दंड ठोठावला आहे. ठेवींवरील व्याजदर, बँकेकडून रिकव्हरी एजंटची नियुक्ती आणि बँकेतील ग्राहक सेवा याबाबत आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता देशातील आघाडीची बॅंक असलेल्या एचडीएफसी बँकेला मोठा दणका बसला आहे.
सूचनांचे पालन न केल्याने ठोठावला दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आज अर्थात 10 सप्टेंबर 2024 रोजी माहिती दिली आहे की, 3 सप्टेंबर 2024 रोजी आरबीआयकडून एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ठेवींवरील व्याजदर, रिकव्हरी एजंट्सची नियुक्ती आणि बँकांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या ग्राहक सेवांबाबत आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंग रेग्युलेशन कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकारांतर्गत ही कारवाई केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
हे देखील वाचा – देशातील सर्वात श्रीमंत महिला यु-ट्युबर; कमाईचा आकडा वाचून लगेचच चॅनेल सुरू कराल…
वैयक्तिक सुनावणीनंतर आरोपांवर शिक्कामोर्तब
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) म्हणण्यानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी तपासणी करण्यात आली. या तपासणीत आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकांना नोटीस बजावून त्यांना दंड का लावू नये? अशी विचारणा करण्यात आली. बँकेकडून उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी घेतल्यानंतर आरबीआयला बँकेवरील आरोप खरे असल्याचे आढळले आहे.
हे देखील वाचा – ‘ही’ आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की; किंमत वाचून चाट पडाल…!
एचडीएफसी बँकेने काही ठेवी स्वीकारण्यासाठी ठेवीदारांना 250 रुपयांची भेट दिली होती. जी मोफत जीवन विमा संरक्षणाच्या पहिल्या वर्षासाठी प्रीमियम म्हणून होती. तसेच बँकेने अशा युनिट्सची बचत ठेव खाती उघडली. जी त्यासाठी पात्र नव्हती. तसेच संध्याकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान ग्राहकांशी संपर्क साधला गेला नाही याची खात्री करण्यात बँक अपयशी ठरली आहे. यासंदर्भात आरबीआयने आपल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे एचडीएफसी बँकेला हा दंड ठोठावण्यात आले आहे, असे म्हटले आहे.