देशातील सर्वात श्रीमंत महिला यु-ट्युबर; कमाईचा आकडा वाचून लगेचच चॅनेल सुरू कराल...
सोशल मीडिया हे आता फक्त मनोरंजनाचे माध्यम राहिले नाही. यातून लोक कोट्यवधी रुपये रोज कमावत आहेत. जर तुम्ही युट्यूब पाहात असाल तर निशा मधुलिका यांचा एखादा तरी व्हिडीओ तुमच्या डोळ्याखालून नक्कीच गेला असेल. निशा मधुलिका ह्या सोप्या पद्धतीने वेगवेगळी पक्वाने बनवण्यात तरबेज आहेत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करत स्वादिष्ट जेवण बनवण्याची कला क्वचितच एखादा यूट्यूबर शिकवत असेल.
नव्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार
सध्याच्या घडीला कुकींग शिकवणारे हजारो यूट्यूब चॅनेल आहेत. त्यांचा मोठा सबस्क्रायबर वर्गही असेल. मात्र, एक काळ असा होता की, या क्षेत्रात केवळ निशा मधुलिका यांचे नाव घेतले जात होते. ज्या वयात लोक निवृत्ती घेण्याचा विचार करतात, त्या वयात निशा यांनी नव्या क्षेत्रात मोठ्ठ नाव कमावण्याची किमया साधली. पण, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. निशा मधुलिका यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी एका नव्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला. आणि यूट्यूबच्या जगात मोठे नाव कमावले.
हे देखील वाचा – ‘ही’ आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की; किंमत वाचून चाट पडाल…!
43 कोटी रुपयांची कमाई
ही स्टोरी केवळ यूट्यूबर बनण्याची नाही. तर या वयातही यश मिळवण्यासाठी स्वावलंबन आणि प्रेरणा देणारी आहे. निशा मधुलिका यांनी 43 कोटी रुपयांची कमाई कशी केली? निशा मधुलिका या मूळच्या उत्तर प्रदेशमधील आहेत. तिथेच त्यांचे पालनपोषण आणि शिक्षण झाले. विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच त्यांना चांगले जेवण बनवण्याची आवड होती. लग्नानंतर त्या दिल्लीत स्थायिक झाल्या, पण पतीच्या व्यवसायात आल्यानंतरही त्यांची स्वयंपाकाची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. या छंदानेच त्यांना यूट्यूबच्या जगात आणले.
२०११ मध्ये यूट्यूबवर म्हणून सुरुवात
निशा मधुलिका यांनी 2007 मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली, स्वतःची वेबसाइट काढली. 2011 मध्ये त्यांनी यूट्यूबवर कुकिंगचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. हा तो काळ होता जेव्हा 1 जीबी डेटा विकत घेण्यासाठी जवळपास 300 रुपये खर्च येत होता. इंटरनेट आजच्या इतके सामान्य नव्हते. बहुतेक लोक कॅफे किंवा ब्रॉडबँडच्या माध्यमातून इंटरनेट एक्सेस करत होते. अशा स्थितीत हळूहळू त्यांचे व्हिडीओ लोकप्रिय होऊ लागले. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर 14.4 मिलियनहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. त्यांच्या अधिकृत चॅनेलवर २२०० व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत.