Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI New Rules : तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम? 1 ऑक्टोबरपासून बदलणार RBIचे ‘हे’ नियम! पाहा संपूर्ण यादी

RBI New Rules From October 1 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI १ ऑक्टोबरपासून बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि वैयक्तिक कर्जाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहे. या नवीन नियमांचा सर्वसामान्य नागरिक, बँक ग्राहक आणि कर्जदारांच्या खिशावर व रोजच्या आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 30, 2026 | 03:53 PM
1 ऑक्टोबरपासून बदलणार RBIचे 'हे' नियम! ( सौजन्य - सोशल मीडिया )

1 ऑक्टोबरपासून बदलणार RBIचे 'हे' नियम! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम?
  • 1 ऑक्टोबरपासून बदलणार RBIचे ‘हे’ नियम!
  • नेमकं काय बदलणार? पाहा  संपूर्ण यादी
RBI New Rules From October 1 : महिन्याच्या पहिल्या तारखेला बरेच नियम बदलतात. परिस्थितीनुसार नव्या गोष्टी जोडल्या जातात आणि त्यानुसार नियमांमध्ये दरांमध्ये बदल होतो. आता सप्टेंबर संपून ऑक्टोबर सुरु होणार आहे. या बदलत्या महिन्यात बरे नियम बदलणार आहे. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे RBI. 1 ऑक्टोबरपासून RBI आपल्या काही नियमांमध्ये बदल करणार आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या नियमांमध्ये हा बदल होणार आहे आणि त्याचे काय परिणाम दिसून येऊ शकतात? ( RBI New Rules From October 1 ) 

काय सांगता? YouTube कडून बंपर कमाई…GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान; 9.6 लाख लोकांना मिळाला रोजगार

बँकिंग प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि आयातदार व निर्यातदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने बरेच नियम लागू करण्याच्या तयारीत आहेत. १ ऑक्टोबर २०२६ पासून हे नियम लागू होतील. या बदलांचा सर्वाधिक परिणाम बल्क फिक्स्ड डिपॉझिट्स Bulk FDs आणि विदेशी व्यापार नियमांवर FEMA होईल.

Bulk FDs नियमांमधील बदल

भारतीय रिझर्व्ह बँके RBI ने आपल्या मुदत ठेव व्याजदर नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या नवीन प्रणालीचा उद्देश बल्क डिपॉझिट दरांची किंमत आणि माहिती पारदर्शक व सुसंगत बनवणे हा आहे. बदललेला हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

व्याजदरांची माहिती देणे बंधनकारक

व्यावसायिक बँकांमधील ₹३ कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या FD या मोठ्या ठेवी म्हणजेच bulk deposits मानल्या जातात. ऑक्टोबरपासून, या बँकांना प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० वाजेपर्यंत त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मोठ्या FD साठी लागू असलेल्या व्याजदरांची माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

या नवीन नियमानुसार, कोणतीही बँक एकाच दिवसाच्या, एकाच कालावधीच्या आणि एकाच रकमेच्या मोठ्या FD वर वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळे व्याजदर देऊ शकणार नाही. याचा अर्थ असा की, FD मोठ्या शहरातील शाखेतून केली असो किंवा ग्रामीण भागातून, व्याजदर सारखाच असेल. रिझर्व्ह बँकेच्या या नवीन नियमामुळे घासाघीस कमी होईल. पूर्वी, मोठे गुंतवणूकदार बँकांशी वैयक्तिकरित्या व्याजदरांवर वाटाघाटी करत असत, परंतु आता त्यांना वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या दरानेच FD कराव्या लागतील.

FEMA नियमांमध्ये शिथिलता

RBI परकीय व्यापाराला चालना देण्यासाठी परकीय चलन व्यवस्थापन कायद्या (Foreign Exchange Management Act FEMA) अंतर्गत नवीन व्यापार नियम लागू करत आहे. १ ऑक्टोबरपासून, अधिकृत डीलर बँका सरकारी नियामकांनी निश्चित केलेल्या एकसमान अंतिम मुदतीऐवजी, दोन्ही पक्षांमधील व्यापार कराराच्या अटींनुसार थेट आयात देयकांवर देखरेख ठेवतील.

हे असे समजू शकतो: पूर्वी, जेव्हा तुम्ही परदेशातून माल आयात करत होता, तेव्हा पुरवठादारासोबत नंतर पैसे देण्याचा करार झाला असला तरी, तुम्हाला RBI ने ठरवून दिलेल्या मुदतीत बँकेमार्फत त्याचे पैसे द्यावे लागत होते. पण सरकारी नियमांमुळे, जर तुम्ही ठरलेल्या मुदतीत पैसे भरण्यात अयशस्वी झालात, तर तुम्हाला थकबाकीदार मानले जात असे.

आता, सरकारने मुदतीची अट रद्द केली आहे. पेमेंटसाठी, बँका फक्त दोन्ही पक्षांमध्ये करारानुसार ठरलेल्या पेमेंटच्या तारखेचा विचार करतील. या नियमामुळे आयातदारांना कोणत्याही सरकारी नियमांच्या बंधनाशिवाय स्वतःच्या अटींवर व्यवसाय करणे सोपे होईल.

Apple युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 15 ऑक्टोबरपासून Apple Pay वरही लागणार MDR Charges? UPI पेक्षा कसा वेगळा आहे नियम?

Web Title: Rbi new rules changed from october 1 check impact on common man marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • bank RBI
  • new rules

संबंधित बातम्या

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम
1

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे
2

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे

धाकधूक वाढली! होम, कार लोनचा EMI वाढणार? Repo Rate मध्ये RBI किती टक्क्यांनी वाढ करणार?
3

धाकधूक वाढली! होम, कार लोनचा EMI वाढणार? Repo Rate मध्ये RBI किती टक्क्यांनी वाढ करणार?

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय
4

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.