
३१ डिसेंबरनंतर जुनी चेक बुक बाद होणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )
सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो, व्हिडिओ आणि व्हायरल होत असतात. हे व्हायरल फोटो विविध दावं करताना मिळतात. याच संदर्भात, भारतीय रिझर्व्ह बँकेशी (RBI) संबंधित एक नवीन दावा देखील वेगाने व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार, १ जानेवारी २०२७ पासून जुनी चेकबुक बंद करून नवीन चेकबुक जारी केली जातील. या संदेशात असेही म्हटले आहे की, ₹५०,००० पेक्षा जास्त रकमेची जुनी चेकबुक स्वीकारली जाणार नाहीत. हा नियम वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमका काय नियम आहे?
आता, खुद्द आरबीआयनेच हे दावे खोडून काढले असून सत्य उघड केले आहे. आरबीआयने म्हटले आहे की, हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे. केंद्रीय बँकेने सध्या असा कोणताही नियम लागू केलेला नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टनुसार, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत जुन्या चेकबुक बदलल्या पाहिजेत. यानंतर, १ जानेवारी २०२७ पासून नवीन चेकबुक वापरणे अनिवार्य असेल. या पोस्टमध्ये नवीन चेकबुकमधील अनेक बदलांचा उल्लेख आहे, ज्यात अल्फा-न्यूमेरिक कोड, नवीन MICR क्रमांक, UV कोड आणि आरबीआय-संबंधित सुरक्षा उपायांचा समावेश आहे. या संदेशात असाही दावा करण्यात आला आहे की, ₹५०,००० पेक्षा जास्त रकमेची जुनी चेकबुक स्वीकारली जाणार नाहीत. लोकांना बँकेच्या शाखेतून किंवा मोबाईल बँकिंग ॲपद्वारे नवीन चेकबुकसाठी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
It has come to the notice of the Reserve Bank of India that a message is circulating on social media claiming that the standard Cheque Truncation System (CTS) cheque books currently in use will change from December 31, 2026 and the new cheque books featuring updated security standards will come into effect from January 1, 2027. It is clarified that at present Reserve Bank of India is not introducing any such measures with regard to the CTS cheque books. As such, the message is factually incorrect and misleading. Members of public are requested to rely only on the information published by RBI from time to time in such matters. — ReserveBankOfIndia (@RBI) November 7, 2026
आरबीआयने हा व्हायरल दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. आरबीआयने ही पोस्ट त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून शेअर केली आहे, ज्यावर स्पष्टपणे ‘बनावट’असे लिहिले आहे. यासोबतच, आरबीआयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे की, सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सध्या वापरात असलेल्या स्टँडर्ड चेक ट्रंकेशन सिस्टीम चेकबुक्स ३१ डिसेंबर २०२६ पासून बदलल्या जातील आणि १ जानेवारी २०२७ पासून अधिक चांगल्या सुरक्षा मानकांसह नवीन चेकबुक्स लागू केल्या जातील.’
त्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “हे स्पष्ट केले जाते की भारतीय रिझर्व्ह बँक सध्या सीटीएस चेकबुकच्या संदर्भात कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे, हा संदेश वस्तुस्थितीच्या विरुद्ध आणि दिशाभूल करणारा आहे. जनतेला विनंती आहे की, अशा प्रकरणांमध्ये त्यांनी केवळ भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जारी केलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा.”
RBI ने जनतेला असेही आवाहन केले आहे की, अशी माहिती किंवा दावे केवळ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खरे ठरत नाहीत. उलट, लोकांनी अधिकृत पुष्टी मिळाल्यानंतरच अशा दाव्यांवर विश्वास ठेवावा. शक्य असल्यास, अशा प्रकरणांमध्ये अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे.
Ans: आरबीआयच्या नियमांनुसार, जर तुमचे चेक बुक CTS - Cheque Truncation System मानकांचे असेल, तर ते ३३ डिसेंबरनंतरही वैध राहील आणि जुनी चेक बुक अचानक रद्द होणार नाहीत.
Ans: CTS मानकानुसार असणाऱ्या चेकवर सहसा विशिष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये आणि 'CTS-2010' असे मुद्रित केलेले असते, जे सर्व आधुनिक चेक बुक्समध्ये असते.
Ans: जर जुन्या पानांचे चेक बुक संपले असेल किंवा बँकेने सुरक्षा मानकांमध्ये बदल करून नवीन चेक बुक बदलण्याची विनंती केली असेल, तरच नवीन चेक बुक काढावे लागते.