YouTube चं GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान ( सौजन्य - सोशल मीडिया )
यूट्यूबची क्रिएटर इकोसिस्टम भारतात वेगाने एक प्रमुख आर्थिक क्षेत्र बनत आहे. यूट्यूबच्या २०२५ इम्पॅक्ट रिपोर्टनुसार, या प्लॅटफॉर्मच्या क्रिएटिव्ह इकोसिस्टमने २०२५ मध्ये भारताच्या GDP मध्ये 18000 कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिलं आहे. याव्यतिरिक्त, या इकोसिस्टमने ९,६०,००० पेक्षा जास्त पूर्ण-वेळ नोकऱ्यांच्या बरोबरीचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
हा अहवाल ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या संशोधनावर आधारित आहे. या अहवालानुसार, यूट्यूबची इकोसिस्टम केवळ कंटेंट क्रिएटर्सनाच फायदा देत नाही, तर सिनेमॅटोग्राफर, साउंड इंजिनिअर, स्क्रिप्ट रायटर आणि प्रोडक्शन प्रोफेशनल यांसारख्या विविध क्रिएटिव्ह आणि टेक्निकल तांत्रिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे.
अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या जीडीपीमध्ये यूट्यूबच्या क्रिएटर इकोसिस्टमचे योगदान वाढले आहे. मागील वर्षी, या इकोसिस्टमने ₹१६,००० कोटींहून अधिक योगदान दिले होते आणि ९.३ लाखांहून अधिक पूर्ण-वेळ नोकऱ्यांच्या बरोबरीचा रोजगार उपलब्ध करून दिला होता.
यूट्यूबच्या मते, या प्लॅटफॉर्मचा आर्थिक प्रभाव आता केवळ प्रमुख महानगरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. जयपूर, लखनौ आणि कोचीसारख्या शहरांमध्येही नवीन क्रिएटर्स उदयाला येत आहेत. या शहरांमध्ये, स्थानिक क्रिएटर्स डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे टेक्नॉलॉजी आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची, तसेच त्यांचे काम आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळत आहे.
अहवालानुसार, गेल्या वर्षभरात, यूट्यूब क्रिएटर इकोसिस्टमने ३,००,००० हून अधिक शिकाऊ उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. हे डिजिटल क्रिएटर अर्थव्यवस्थेमध्ये तरुणांसाठी वाढत्या प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी दर्शवतो.
भारत ही यूट्यूबची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशात या प्लॅटफॉर्मचे ५० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. यामुळे भारत जागतिक स्तरावर यूट्यूबसाठी एक प्रमुख विकास केंद्र बनला आहे. कंपनीच्या मते, जून २०२६ पर्यंत भारतातील २०,००० हून अधिक यूट्यूब चॅनेल १० लाख सबस्क्राइबरचा टप्पा ओलांडतील.
भारतीय क्रिएटर्सची पोहोच आता केवळ देशांतर्गत प्रेक्षकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. यूट्यूबच्या मते, भारतीय चॅनेलवर तयार केलेल्या कंटेंटच्या एकूण वॉच टाइमपैकी १५% पेक्षा जास्त वॉच टाइम देशाबाहेरील प्रेक्षकांकडून येतो. हे भारतीय क्रिएटर्सच्या कंटेंटची वाढती जागतिक पोहोच दाखवतो.
यूट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात भारतातील २ लाखांहून अधिक चॅनेल्सनी या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच कमाई करण्यास सुरुवात केली आहे. वार्षिक १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या चॅनेल्सच्या संख्येत वर्षानुवर्ष २०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कमाई करणाऱ्या या क्रिएटर्सपैकी ७३% जणांनी यूट्यूबला त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याचे सांगितल जात आहे. त्यामुळे भारतासाठी हे क्षेत्र किती महत्त्वाची भूमिका बजावत आहे हे हा अहवालातून दिसून येतं.






