
RBI shaken by Karnataka bank employee's 'fat finger error' Banking Error (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Karnataka Banking Error : आयुष्यात आपण जेवढे शून्य बघितले नसतील तेवढे शून्य लागलेली रक्कम निष्क्रिय खात्यात गेल्याने आरबीआय सोबतच अनेकांची झोप उडाली आहे. कर्नाटक बँकेतील असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्याने आरबीआयची सुद्धा झोप उडवली आहे. कर्नाटक बँकेतील एका कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे निष्क्रिय खात्यात तब्बल 1 लाख कोटी रुपये गेले. या प्रकाराची माहिती मिळताच आरबीआयने संताप व्यक्त केला. देशाच्या बँकिंग व्यवस्थेला या घटनेने हादरवून टाकले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेची माहिती बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापन अथवा मंडळापासून लपवण्यात आली होती.
कर्नाटक बँकेत काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली होती. एक कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 1 लाख कोटी रुपयांइतकी रक्कम निष्क्रिय खात्यामध्ये हस्तांतरित केली गेली. मात्र, हा घोटाळा नव्हे तर ‘फॅट फिंगर एरर’ होता. म्हणजेच बँक कर्मचाऱ्याची टायपिंग मिस्टेक होती. त्यामुळे तब्बल एवढी मोठी रक्कम बंद खात्यात जमा झाली. या घटनेनंतर तीन तासांत सर्व पैसे परत करण्यात आले. परंतु, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या व्यवहार संबधित चिंतेत असून इतकी मोठी चूक नेमकी कशी झाली आणि बँकेची देखरेख यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे.
‘फॅट फिंगर एरर’ने उडवली सिस्टीमची झोप
कर्नाटक बँकेतील एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे निष्क्रिय बचत खात्यात तब्बल एक लाख कोटी रुपये जमा झाले होते. हा एक ‘फॅट फिंगर एरर’ नव्हता तर देशाच्या बँकिंग व्यवस्थेला हादरवणारी बाब होती. खळबळजनक गोष्ट म्हणजे या घटनेची माहिती ना वरिष्ठ व्यवस्थापनाला होती ना मंडळाला माहीत होती. मात्र, ही घटना उघडकीस आल्याने आरबीआयने गंभीर निष्काळजीपणा म्हणून याची चौकशी करायचे आदेश दिले आहे.
ही घटना दोन वर्षाधी ऑगस्ट 2023 मध्ये घडली होती, मात्र, आता ती उघड झाल्याने आरबीआयने कडक कारवाईचे आदेश दिले आहे. एका बँकेच्या कर्मचाऱ्याच्या चुकीने एवढी मोठी रक्कम बंद खात्यात जमा झाली, पण ती तीन तासात परत सुध्दा करण्यात आली. यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान टळले. या घटनेनंतर आपली जोखीम व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी कर्नाटक बँक प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, या प्रकरणात आरबीआयने बँकेला स्पष्टीकरण मागितले आहे.
हेही वाचा : Retail Inflation in October 2025 : जीएसटी कपातीने केली कमाल! भाज्या-फळांचे दर कोसळले, तेल मात्र महागले
बँकिंग व्यवस्थेच्या जगतात खळबळ
कर्नाटक बँकेने केलेल्या चुकीच्या नोंदीमुळे देशभरातील बँकिंग व्यवस्था सतर्क झाले आहेत. मात्र, या सगळ्यामुळे आरबीआय चिंतेत असून त्यांनी याचा तपास सुरू केला आहे. बँकेने जेव्हा या घटनेनंतर चौकशी केली तेव्हा, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. याव्यतिरिक्त, बँकेच्या आयटी सिस्टीममध्ये अशी चूक भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी ऑडिट करण्यात आले.