Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market: सकाळच्या पडझडीनंतर शेअर बाजाराचा जोरदार कमबॅक; नेमके काय आहे कारण?

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात ही पडझडीने झाल्याने निराशेचे वातावरण असताना काही वेळात बाजारात बदल झाला आणि शेअर बाजार कमालीचा वधारला. बाजार वधारण्याची नेमके कारण काय हे जाणून घेऊया

  • By नारायण परब
Updated On: Dec 05, 2024 | 05:10 PM
सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा... का होतीये बाजाराची घसरगुंडी!

सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा... का होतीये बाजाराची घसरगुंडी!

Follow Us
Close
Follow Us:

आज सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात निराशादायक झाली मात्र काही वेळात बाजारात बदल झाला आणि शेअर बाजार कमालीचा वधारला. सेन्सेक्सने तब्बल 82 हजारांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीनेही मोठी उसळी घेत 24800 चा टप्पा पार केला होता. मात्र शअर बाजार बंद होण्यापूर्वी  काही वेळा अगोदर बाजारात थोडीशी घसरण पाहायला मिळाली आणि सरतेशेवटी बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 809 अंकांच्या वाढीसह 81,765 स्तरावर बंद झाला. त्याच वेळी एनएसई निर्देशांक निफ्टी सुमारे 241 अंकांची उसळी घेत 24708 वर बंद झाला. शेअर बाजारातील वाढीचे कारण काय हे लक्षात घेऊया.

Repo Rate: तुमचा EMI कमी होणार का? 6 डिसेंबरला RBI चा रेपो रेटचा निर्णय

रिझर्व्ह बॅंक

अमेरिकेतील चांगल्या बातमीमुळे भारतातील देशांतर्गत अर्थव्यवस्थाही उत्तम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  रिझर्व्ह बँक ही 6 डिसेंबरला दर कपातीचे संकेत देऊ शकते, असे बाजार गृहीत धरत आहे. रेपो दर कमी केला नाही तरी भविष्यात व्याजदर कमी होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विदेशी गुंतवणूकदार

विदेशी संस्थागत गुंतवणूकदार हे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच निव्वळ खरेदीदार बनले असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून निव्वळ विक्री करणाऱ्या एफआयआयने ( Foreign Institutional Investor)  काल बुधवारी 1798 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. मंगळवारी परदेशी गुंतवणूकदारांनी 3665 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. हा चढता ट्रेंड या महिन्यात पाहायला मिळत आहे. मात्र मागील दोन महिन्यात परिस्थिती या उलट होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एफआयआयने भारतीय बाजारातून तब्बल १.६ लाख कोटी रुपये काढून घेतले होते.

सर्वाधिक कमाई करणारा स्टॉक

निफ्टीवरील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या शेअर्समध्ये ट्रेंट पहिल्या स्थानावर आहे. ट्रेंटचा शेअर  3.31 टक्क्यांनी वाढला आणि  7,074.95 अंकांवर बंद झाला आहे.  इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 2.42 टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर टीसीएस 2.31 टक्क्यांनी वाढ झाली, टायटनचे शेअर्स 2.19 ट्क्क्यांनी वधारले तर  डॉ. रेड्डी च्या शेअर्समध्ये 2.18 ट्क्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या शेअर्सधारकांना आज फायदा मिळाला आहे.

आनंद महिंद्रांचे भडकलेल्या ग्राहकाला उत्तर, 1991 पासून सांगितली स्टोरी, वाचा… सविस्तर!

‘या’ शेअर्समध्ये झाली घसरण 

एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो, एनटीपीसी आणि ग्रासिम या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. एसबीआय लाईफच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली कंपनीचे शेअर्स 1.21 टक्क्यांनी घसरले. एचडीएफसी लाईफचे शेअर्स हे 1.09 टक्क्यांनी घसरले तसेच बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये 1.05 टक्क्यांची घसरण झाली. एनटीपीसीच्या शेअर्समध्ये 0.90 ट्क्क्यांची घसरण पाहायला मिळाली तर ग्रासीमच्या शेअर्समध्ये 0.38 टक्के घसरण झाली आहे.

उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने आता उद्याही देशांतर्गत शेअर बाजार वधारलेला राहिल्यास या महिन्याच्या पहिल्या आठवड्या शेअर बाजाराची कामगिरी अत्यंत उत्तम होणार आहे.

 

Web Title: Reasons for growth of indian domestic stock market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 05:08 PM

Topics:  

  • bse
  • Reserve Bank
  • share market

संबंधित बातम्या

Bonus Share: याला म्हणतात शेअर…! 3 शेअरवर 1 शेअर फ्री, याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
1

Bonus Share: याला म्हणतात शेअर…! 3 शेअरवर 1 शेअर फ्री, याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!
2

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित
3

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये
4

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.