...तब्बल 99 टक्क्यांनी घसरला रिलायन्सचा शेअर; 792 रुपयांचा शेअर घसरला 2 रुपयांवर!
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या नेतृत्त्वातील कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअर्सने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. रिलायन्सच्या एका शेअरने तर गुंतवणूकदांरांना कंगाल केले आहे. अखेर या शेअरचे ट्रेडिंग 4 नोव्हेंबरपासून सस्पेंड करण्यात आले आहे.
गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका
रिलायन्सचा हा शेअर 792 रुपयांवरून थेट 2 रुपयांवर घसरला आहे. परिणामी गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गुंतवणूकदारांची 1 लाख रुपयांची गुंतवणूक 252 रुपयांवर आली आहे. रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची शेवटची क्लोजिंग किंमत 2 रुपये 9 पैसे आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सची वाटचाल दिवाळखोरीकडे
रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी सध्या दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा आहे. रिलायचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 15 टक्क्यांनी घसरले आहेत. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसत होती. शेअर्समध्ये 34 टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, या वर्षी वायटीडीचा स्टॉक आतापर्यंत केवळ 4 टक्केच वर सरकला आहे.
रिलायन्सचा स्टॉक एका वर्षात 20 टक्क्यांनी वाढला आहे. पाच वर्षांत त्यात 198 टक्क्यांपर्यंत वाढ देखील नोंदवण्यात आली आहे. मात्र, दीर्घकाळात कंपनीच्या शेअर्सचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बीएसईच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे ट्रेडिंग सस्पेंड करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
99 टक्क्यांनी घसरला रिलायन्सचा शेअर
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअरची किंमत 11 जानेवारी 2008 रोजी 792 रुपयांवर पोहोचली होती. आता मात्र, या शेअर तब्बल 99 टक्क्यांनी घसला आहे. रिलायन्सच्या या शेअरमध्ये गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असतील तर ते त्याचे आता 252 रुपये झाले असतील. याचा अर्थ असा, की रिलायन्सच्या या शेअरने गुंतवणूकदारांचे दिवाळे काढले आहे. रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वाधिक किंमत फक्त 2 रुपये 59 पैसे आहे. तर याच कालावधीत ही किंमत 1 रुपया 47 पैशांवरही घसरली आहे. रिलायन्सच्या या शेअरचे मार्केट कॅप 589.06 कोटी रुपये आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)