मुंबई : भारतातील (India) आघाडीच्या जनरल विमा कंपन्यांपैकी (General Insurance Companies) एक, रिलायन्स जनरल इन्शुरन्सने (Relaiance General Insurance) जागतिक अवयवदान दिनानिमित्त (World Organ Donation Day) अवयव दान (Organ Donation) लोकप्रिय करण्यासाठी “द डी-सीरिज प्रोजेक्ट” (The D Series Project) ही जनजागृती मोहीम (Awareness Movement) सुरू केली आहे.
जनसामान्यांमध्ये अवयव दानाबद्दल जागृती करण्यासाठी या मोहिमेमध्ये लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या आकर्षक गीतांचा उपयोग करण्यात येत आहे. माध्यम आणि सर्जनशील संदर्भाद्वारे, संवादात ‘हृदय’, ‘डोळे’ आणि ‘यकृत’ यांसारख्या शब्दांशी खेळून संदेश विचारपूर्वक एकत्र केले आहेत. मोहिमेत लोकप्रिय हिंदी गाणी वापरण्याचा उद्देश श्रोत्यांशी सहजतेने जोडणे हा आहे आणि अवयवदानाला गाण्याशी जोडण्याचा उद्देश कायम राखून जागरूकता निर्माण करणे हा आहे.
उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी, रिलायन्स जनरल इन्शुरन्सने मायक्रोसाइट सुरू केली आहे. www.thedseriesproject.in जिथे लोक अवयव दानाबद्दल माहिती जाणून घेऊ शकतात तसेच अवयव हे दानाचे उद्दिष्ट ठेवू शकतात.
[read_also content=”२० रुपयांसाठी ‘भारतीय रेल्वे’शी २२ वर्ष दिला कायदेशीर लढा, आता मिळणार ‘एवढे पैसे’ https://www.navarashtra.com/india/man-of-mathura-fought-against-indian-railways-in-court-for-20-rupees-for-more-than-22-years-nrvb-316017.html”]
प्रत्यारोपणासाठी अवयवांची कमतरता ही सार्वत्रिक समस्या आहे; मात्र, भारतातील परिस्थिती बिकट आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, प्रति दशलक्ष लोकांमध्ये एकापेक्षा कमी व्यक्ती, भारतातील अवयवदानाचे प्रमाण जगातील सर्वात कमी असण्याचा अंदाज आहे. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की देशात वर्षभरात अवयव प्रत्यारोपणाच्या एकूण गरजांपैकी केवळ 2-3% भाग पूर्ण होतो.
उदाहरणार्थ, ऑर्गन रिट्रीव्हल बँकिंग ऑर्गनायझेशन (ओआरबीओ), एम्स नुसार, दरवर्षी सरासरी 2 लाख लोकांना किडनी प्रत्यारोपणाची गरज असते. तर केवळ 10,000 डोनर मिळतात. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की एक दाता 8 जीव वाचवू शकतो कारण ब्रेन डेड व्यक्तीचे 8 अवयव उपयोगात येऊ शकतात.
अवयवदानाविषयी ज्ञानाचा अभाव आणि पूर्वग्रहांमुळे अनेकदा लोक स्वतःचे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अवयव दान करण्यापासून रोखतात. त्यामुळे अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून ते एक जनआंदोलन बनून लोक स्वेच्छेने अवयव दान करतील.