Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हिजन 2030 ग्रोथ स्‍ट्रॅटेजीसाठी रिलायन्‍स ग्रुपकडून ‘रिलायन्‍स ग्रुप कॉर्पोरेट सेंटर’ची स्‍थापना

रिलायन्‍स ग्रुपने आपल्‍या व्हिजन २०३० : ग्रोथ स्‍ट्रॅटेजीचा भाग म्‍हणून ‘रिलायन्‍स ग्रुप कॉर्पोरेट सेंटर (आरजीसीसी)’लाँच केले आहे. हे सेंटर आरजीसीसी धोरणात्‍मक हब म्‍हणून सेवा देईल.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 19, 2024 | 02:43 PM
व्हिजन 2030 ग्रोथ स्‍ट्रॅटेजीसाठी रिलायन्‍स ग्रुपकडून ‘रिलायन्‍स ग्रुप कॉर्पोरेट सेंटर’ची स्‍थापना
Follow Us
Close
Follow Us:

आरजीसीसीच्‍या मुख्‍य टीमध्‍ये ग्रुपचे प्रमुख सतीश शेठ, पुनित गर्ग आणि के. राजा गोपाल यांचा समावेश असेल. ज्‍यांना व्‍यवस्‍थापन कौशल्‍यांमध्‍ये एकत्रित १०० वर्षांचा, तसेच रिलायन्‍स ग्रुपमध्‍ये कामकाजाचा ५० वर्षांचा अनुभव आहे. शेठ आणि गर्ग दोन दशकांहून अधिक काळापासून ग्रुपशी संलग्‍न आहेत. जेथे ते विविध नेतृत्‍व पदांमध्‍ये सेवा देत आहेत. पुनित गर्ग सध्‍या रिलायन्‍स इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून नेतृत्‍व करत आहेत. तर के. राजा गोपाल सहा वर्षांपासून रिलायन्‍स पॉवरचे नेतृत्‍व करत आहेत. त्‍यांना ऊर्जा क्षेत्रात २७ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.

स्‍थापना करण्‍यात आलेल्‍या आरजीसीसीचा ग्रुपच्‍या भविष्‍यकालीन विकास उपक्रमांना पाठिंबा देण्‍यासाठी आणि भावी प्रकल्‍पांकरिता नेतृत्‍वाची भावी पिढी घडवण्‍यासाठी या अनुभवी प्रमुखांच्‍या इन-हाऊस कौशल्‍याचा वापर करण्याचा मनसुबा आहे. आरजीसीसी उदयोन्‍मुख प्रमुखांना मार्गदर्शन व विकसित करण्‍यामध्‍ये, ग्रुपला शाश्‍वत विकासाच्‍या दिशेने घेण्‍यासाठी नवीन टॅलेंटला अनुभव देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

हे देखील वाचा – 25 हजारात सुरु केला व्यवसाय; आज करतायेत 10 ते 12 लाखांची कमाई, महिलेची प्रेरणादायी यशोगाथा!

रिलायन्‍स ग्रुपचे प्रवक्‍ता म्‍हणाले आहे की, ‘’आम्‍हाला व्‍यापक कौशल्‍ये असलेल्‍या अनुभवी व्‍यावसायिकांची टीम आरजीसीसी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या धोरणात्‍मक पुढाकाराचा या प्रमुखांच्‍या व्‍यापक अनुभवाचा फायदा घेत ग्रुपच्‍या भावी विकासाला दिशा देण्‍याचा मनसुबा आहे. ज्‍यामुळे उद्योगामधील आव्‍हानांमधून नेव्हिगेट करता येईल आणि नवीन संधींचा फायदा घेता येईल. तसेच नाविन्‍यतेला चालना देता येईल आणि ग्राहक व भागधारकांना अपवादात्‍मक मूल्‍य देता येईल. आमचा विश्‍वास आहे की, आरजीसीसी आमच्‍या ग्रुपच्‍या यशाच्‍या भावी टप्‍प्‍याला आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.’’

हे देखील वाचा – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स 77,371 अंकांपर्यंत कोसळला!

अलिकडील घडामोडींमध्‍ये, रिलायन्‍स ग्रुप अंतर्गत प्रमुख कंपन्‍या रिलायन्‍स इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर लि. आणि रिलायन्‍स पॉवर लि. यांनी शून्‍य बँक कर्ज दर्जा संपादित केला आहे आणि नवीन विकास क्षेत्रांमधील विस्‍तारीकरणासाठी योजना आखल्‍या आहेत. रिलायन्‍स पॉवरने भूतानमध्‍ये १,२७० मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा संपादित केली आहे. तर रिलायन्‍स इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर आपली उपकंपनी रिलायन्‍स डिफेन्‍स लि.च्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रातील रत्‍नागिरी येथे १,००० एकर जागेवर लहान शस्‍त्रे, दारूगोळा व स्‍फोटकांसाठी उत्‍पादन केंद्र उभारत आहे.

या महत्त्वाकांक्षी विस्‍तारीकरण योजनांना पाठिंबा देण्‍यासाठी कंपन्‍यांनी १७,६०० कोटी रूपयांच्‍या एकत्रित निधी उभारणी प्रयत्‍नाची घोषणा केली आहे. यामध्‍ये प्राधान्‍य इक्विटी इश्‍यूंच्‍या माध्‍यमातून ४,५०० कोटी रूपये, इक्विटी-लिंक्‍ड दीर्घकालीन एफसीसीबींच्‍या माध्‍यमातून वर्दे पार्टनर्सकडून ७,१०० कोटी रूपये आणि क्‍वॉलिफाइड इन्स्टिटयूशनल प्‍लेसमेंट (क्‍यूआयपी)च्‍या माध्‍यमातून ६,००० कोटी रूपयांच्‍या निधी साह्याचा समावेश आहे. ज्या ठिकाणी रिलायन्‍स पॉवर आणि रिलायन्‍स इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरचे प्रत्‍येकी ३,००० कोटी रूपयांचे लक्ष्‍य आहे.

Web Title: Reliance group establishes reliance group corporate center for vision 2030 growth strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • reliance group

संबंधित बातम्या

JioFinance Super Update : जिओफायनान्सचं नवं फीचर Launch! तुमचे सगळे पैसे आता एका अ‍ॅपमध्ये दिसणार?
1

JioFinance Super Update : जिओफायनान्सचं नवं फीचर Launch! तुमचे सगळे पैसे आता एका अ‍ॅपमध्ये दिसणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.