२५ हजारात सुरु केला व्यवसाय; आज करतायेत 10 ते 12 लाखांची कमाई, महिलेची प्रेरणादायी यशोगाथा!
सध्याच्या घडीला अनेकांचा ओढा नोकरीऐवजी उद्योगधंद्यांकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर अनेकांना त्यात यश देखील मिळत आहे. यासोबतच अनेक जण मेहनत आणि कामात सातत्य ठेऊन यश खेचून आणत आहे. आज आपण अशाच एका महिला उद्योजिकेची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी २५ हजार रुपये गुंतवणुकीतून व्यवसाय सुरु केला. ज्यातून त्या आज लाखोंची कमाई करत आहे.
२५ हजार भांडवलात सुरु केला व्यवसाय
सोनिका असे या महिला उद्योजिकेचे नाव असून, ती उत्तरप्रदेशातील मेरठच्या राली चौहान गावातील रहिवासी आहे. सोनिका यांनी फक्त २५ हजारात व्यवसायाची सुरुवात केली. सोनिका यांचा प्रवास सोपा नव्हता. सोनिकाचा नवरा घराला रंगकाम करायचा. त्यामुळे उत्पन्न फार कमी होते. कधी काम असायचे तर कधी नसायचे. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण व्हायचे. परंतु, सोनिकाने या परिस्थितीवर मात करायचे ठरवले. त्यानुसार तिने काहीतरी उद्योगधंदा सुरु करण्याचा मनी चंग बांधला.
हे देखील वाचा – चांदीची चमक वाढणार; दरात 125000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ होण्याची शक्यता!
झाडू बनवण्याचे घेतले प्रशिक्षण
त्यातच तिला झाडू बनवण्याच्या व्यवसायाची कल्पना सुचली. तिने झाडू बनवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे तिने हे झाडू घरीच बनवले. त्यानंतर हळहळू त्यांनी बनवलेल्या झाडूची मागणी वाढू लागली. सोनिकाने जेल चुंगी येथून झाडू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर त्यांनी २५ हजार रुपये गुंतवून झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. तिचा हा व्यवसाय आज चांगलाच बहरला आहे.
किती होतीये कमाई
सोनिकाने बनवलेले झाडू अनेक दुकानदारांना खूप आवडले. त्यांनी ते झाडू विकत घेतले. यानंतर ऑर्डर वाढू लागल्या. त्यानंतर सोनिकाचा नवरा आणि गावातील महिलांनी देखील या व्यवसायात हातभार लावायचे ठरवले. पूर्वी सोनिका झाडू बाजारात घेऊन जात असेल. परंतु, आज ती ट्रकने मालाचा पुरवठा करते. तिचे झाडू दिल्लीत देखील विकले जातात. सोनिकाचा नवरा आता मार्केटिंगचे काम करतो. आता त्यांची उलाढाल जवळपास १० ते १२ लाखांच्या घरात आहे. सोनिका प्रशिक्षित महिलांना रोज ८०० ते १००० रुपये देते.
महिलांसाठी बनल्यात प्रेरणास्त्रोत
सोनिका मेरठच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी जाते. आज ती महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. त्यांचे मेहनत आणि समर्पण हे त्यांच्या यशाचे कारण आहे. तिने २५ हजार रुपयांपासून सुरु केलेल्या बिझनेसमधून आज ती लाखोंचे उत्पन्न कमावत आहे. मेरठच्या राली चौहान गावातील सोनिका हिची ही सक्सेस स्टोरी इतर महिलांसाठी एक आदर्शवत ठरत आहे.