लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार; वाचा... कितीये किंमत पट्टा!
अमेरिकेच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध ग्राहक कंपन्यांना तंत्रज्ञान आधारित बिझनेस सोल्यूशन्स व सेवा पुरवणारी प्रख्यात कंपनी सॅजिलिटी इंडिया लिमिटेड या कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात दाखल होणार आहे. हा आयपीओ अर्थात खुल्या शेअर्स विक्रीसाठी प्रति शेअर 28 रुपये ते 30 रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीच्या प्रत्येक शेअर्सचे दर्शनी मूल्य हे 10 रुपये हे ठरवण्यात आले आहे.
सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ हा येत्या मंगळवारपासून अर्थात 5 नोव्हेंबरपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. तर हा आयपीओ 7 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या इच्छुक गुंतवणूकदार किमान 500 शेअर्स व त्यापुढे 500 च्या पटीत शेअर्ससाठी बीड करु शकणार आहे.
हा संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेलद्वारे विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. त्या अंतर्गत एकूण 702.20 दशलक्ष समभाग प्रमोटर सेलींग शेअरहोल्डर सॅजिलिटी बी. व्ही. कडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यातून बीड करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 2 रुपये सवलत देऊन समभाग देण्यात येतील.
सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी ही केवळ आरोग्यसेवा क्षेत्रांसाठीच सेवा पुरवणारी कंपनी असून, कंपनीच्या ग्राहकांमध्ये अमेरिकेतील आरोग्य विमा कंपनी पेअर्सचा समावेश आहे. पेअर्स कंपनी आरोग्य सेवा खर्च भरपाई करुन देणारी कंपनी आहे. तसेच अमेरिकेतील प्राथमिक हॉस्पिटल्स, फिजिशिअन्स, डायग्नॉस्टिक्स व मेडीकल डिव्हायसेस कंपन्यांचा देखील सॅजिलिटी इंडिया कंपनीच्या ग्राहकांमध्ये समावेश आहे.
पेअर्स कंपनीच्या प्रचाललनातील विविधि टप्प्यांवर सॅजिलिटीची सेवा उपयुक्त् ठरते. त्यात विमा दावे व्यवस्थापन, कंपनी प्रशासन, नवग्राहक जोडणी, बेनिफिट प्लान आखणी, प्रिमिअम बिलींग, क्रेडेन्शिअलिंग, डेटा मॅनेजमेंट, क्लिनिकल फंक्शन्स जसे युटिलायझेशन मॅनेजमेंट, केअर मॅनेजमेंट आणि पॉप्युलेशन हेल्थ मॅनेजमेंट या विविध टप्प्यांचा समावेश आहे.
सॅजिलिटी कंपनीने 2024 आर्थिक वर्षात पेअर कंपनीला 105 दशलक्ष विमा दाव्यांची प्रक्रिया करण्यास मदत केली तसेच 75 दशलक्ष सदस्य व प्रोव्हायडरना संवाद साधण्यास मदत केली आहे. शेअरबाजारात सूचीबद्ध असलेली आणि अमेरिकेतील आरोग्य सेवा कंपन्यांना अशा प्रकारची सेवा देणारी एकही कंपनी भारतात सध्या तरी नाही. 30 जून 2024 रोजी पर्यंतच्या माहितीनुसार, सॅजिलिटी कंपनीमध्ये एकूण 35,858 कर्मचारी असून त्यापैकी 60.53% महिला आहेत. 30 जून 2023 रोजी कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 33,575 होती.
2024 आर्थिक वर्षात सॅजिलीटी इंडियाचा रिस्टेटेड प्रचालन महसूल 12.69 टक्के वाढून, 4,753.56 कोटी रुपये झाला आहे जो आधीच्या वर्षी रु. 4,218.41 कोटी होता. कंपनीच्या विद्यमान ग्राहकांडून वाढीव मागणी आल्यामुळेच कंपनीच्या महसूलात ही वाढ झाली आहे. तसेच 2024 साली काही नव्या एसओडब्ल्यूंची देखील भर पडली आहे. त्याचप्रमाणे कंपनीचा करोत्तर नफा (पीएटी) 2024 साली तब्बल 58.99 % टक्के वाढून 228.27 कोटी रुपये झाला आहे जो 2023 साली रु. 143.57 कोटी होता.