फोटो सौजन्य: iStock
हल्ली सोशल मीडियावर अनेक फिन इन्फ्ल्यूएंसर्स दिसतील, जे अनेकांना आर्थिक सल्ले देताना दिसतात. काही वेळेस याच आर्थिक सल्ल्यांना बळी पडून अनेक जण चुकीच्या ठिकाणी आपले पैसे लावून बसतात. जेणेकरून, पुढे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच आता सेबीने या फिन इन्फ्ल्यूएंसर्स आणि चुकीच्या आर्थिक माहिती देणाऱ्या वेबसाइट्सवर कारवाई केली आहे.
जर तुम्ही देखील यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर शेअर बाजारातील फिन इन्फ्ल्यूएंसर्स पाहून कोणतेही शेअर्स खरेदी किंवा विक्री करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खरंतर, 2024 मध्ये शेअर बाजाराबाबत लोकांची दिशाभूल करणाऱ्या अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. नुकतीच यातील एका इन्फ्ल्यूएंसवर कारवाई करण्यात आली. याशिवाय, या वर्षी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने देखील 15000 हून अधिक साइट्सवर बंदी घातली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्यांवर सेबीने यावर्षी मोठी कारवाई केली आहे. SEBI ने 15,000 हून अधिक वेबसाइट्स आणि अनेक आर्थिक इन्फ्ल्यूएंसर्सवर बंदी घातली आहे. या फिन इन्फ्ल्यूएंसर्सवर सोशल मीडियामार्फत चुकीच्या गुंतवणुकीचा सल्ला देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आणि त्यांच्या पैशाचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
‘हा’ आहे 2024 मधील शेवटचा IPO, GMP आहे दमदार, लागला तर उजळेल नशीब
या वर्षीच्या कारवाईत SEBI ने रवींद्र बाळू भारती आणि नसीरुद्दीन अन्सारी यांसारख्या अनेक नामांकित आर्थिक इन्फ्ल्यूएंसर्सवर बंदी घातली आहे. अन्सारी ‘Baap of Chart’ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर अॅक्टिव्ह होता, जिथे त्याने शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला दिला. सेबीने अन्सारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एस्क्रो अकॉउंट उघडून १७ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या सेवा वापरल्या आहेत त्यांना पैसे परत करण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल.
याशिवाय अन्सारी यांना 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पद्मती, तबरेज अब्दुल्ला, वाणी आणि वामशी यांच्यासह त्याच्या साथीदारांनाही दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शुभांगी रवींद्र भारती, राहुल अनंत गोसावी आणि धनश्री चंद्रकांत गिरी यांच्यावरही शेअर बाजारातून बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय नारी सोनं ठेवणीच्या बाबतीत संपूर्ण जगावर भारी! तब्बल ‘इतके’ टन सोन्यावर भारतीय महिलांचे नाव
SEBI च्या तपासात असे दिसून आले आहे की या इन्फ्ल्यूएंसर्सनी कोणत्याही डिस्क्लेमरशिवाय विशिष्ट स्टॉकना प्रोत्साहन दिले. त्याने आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी कंपन्यांकडून पैसे घेतले आणि त्या बदल्यात त्यांच्या स्टॉकची ग्राहकांना शिफारस केली. यामुळे गुंतवणूकदारांची केवळ दिशाभूलच झाली नाही तर बाजारातील स्टॉकच्या किंमतीही वाढल्या, जे बाजाराच्या नियमांच्या विरुद्ध आहे.