फोटो सौजन्य: iStock
यंदाच्या वर्षी अनेक उत्तम IPO मार्केटमध्ये आले होते. यातील काही आयपीओने गुंतवणूकदारांना नक्कीच डबल रिटर्न दिले आहे. म्हणूनच आता प्रत्येक जण हा निरनिराळ्या कंपनीच्या येणाऱ्या आयपीओवर लक्ष ठेवून असतात. आता जरी हे वर्ष संपायला आले असले तरी जाता जाता एक शेवटचा आयपीओ मार्केटमध्ये येणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
जर तुम्ही IPO गुंतवणूकदार असाल आणि IPO मध्ये पैसे गुंतवून नफा कमावत असाल तर वर्षातील शेवटचा IPO देखील तुमच्यासाठी चांगला असू शकतो. Indo Farm Equipment च्या IPO ने गुंतवणूकदारांसाठी 2024 च्या शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी आणली आहे. हा IPO 31 डिसेंबर 2024 रोजी उघडणार असून 2 जानेवारी 2025 रोजी बंद होईल. या आयोपीओची BSE आणि NSE वर लिस्टिंग 7 जानेवारी 2025 रोजी होऊ शकते.
भारतीय नारी सोनं ठेवणीच्या बाबतीत संपूर्ण जगावर भारी! तब्बल ‘इतके’ टन सोन्यावर भारतीय महिलांचे नाव
इंडो फार्म इक्विपमेंट 1994 पासून ट्रॅक्टर आणि पिक व कॅरी क्रेन यांसारखी कृषी उपकरणे तयार करत आहे. हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे पसरलेल्या या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता 12,000 ट्रॅक्टर आणि 1,280 क्रेन आहे. कंपनी आपली उत्पादने केवळ भारतातच नाही तर नेपाळ, सीरिया, सुदान, बांगलादेश आणि म्यानमार सारख्या देशांमध्ये निर्यात करते.
IPO साइज: एकूण रु. 260.15 कोटी
नवीन शेअर्स: 184.90 कोटी
ऑफर फॉर ऑफर: 75.25 कोटी
फेस व्हॅल्यू: 10 रुपये प्रति शेअर
प्राइस बँड: 204-215 रुपये प्रति शेअर
लॉट साइज: 69 शेअर्स
या IPO मध्ये, 50 टक्के हिस्सा क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी (QIBs), 35% रिटेल इन्व्हेस्टरसाठी आणि 15% नॉन-इंस्टीट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.
धडाधडा का सोडल्या जात आहेत बँकेच्या नोकऱ्या, RBI ला फुटला घाम; असं तर काम करणं होईल कठीण
2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 1% ने वाढून रु. 375.95 कोटी झाला, तर मागील वर्षी तो रु. 371.82 कोटी होता. निव्वळ नफाही 1% ने वाढून रु. 15.6 कोटी झाला आहे. एप्रिल-जून 2024 दरम्यान, कंपनीने 75.54 कोटी रुपयांचा महसूल आणि 2.45 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला.
कंपनी ही रक्कम नवीन क्रेन युनिट स्थापन करण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, तिच्या NBFC उपकंपनी बरोटा फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि कॉर्पोरेटच्या सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठी वापरेल.
इंडो फार्म इक्विपमेंटचा IPO ग्रे मार्केटमध्ये 85 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. या प्रीमियमच्या आधारे, IPO लिस्टिंग सुमारे 295 रुपये अपेक्षित आहे, जे इश्यू किंमतीपेक्षा 37.21% अधिक आहे. याचा अर्थ ग्रे मार्केटचा ट्रेंड लक्षात घेता इंडो फार्म इक्विपमेंटच्या आयपीओमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.