share market up
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरु होती. मात्र आज सेन्सेक्स (Sensex) तेजीसह बंद झाला. बाजारात दिवसभर अस्थिरता दिसून आली होती. त्यानंतर आयटी सेक्टरमधील (IT Sector) स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर वाढल्याने बाजार वधारत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 142.43 अंकांनी वधारत 60,806.22 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 21.80 अंकांनी वधारत 17,893.50 अंकांवर स्थिरावला.
आज शेअर बाजारात व्यवहार झालेल्या सूचीबद्ध कंपन्यांपैकी 1670 कंपन्यांचे शेअर वधारले. तर, 1714 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 142 कंपन्यांच्या शेअर दरात कोणाताही बदल झाला नाही. अदानी एंटरप्रायझेस, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला आणि जेएसडब्लू स्टील या कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. तर, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी लाइफ, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
इंडेक्स किती अंकावर बंद दिवसातील उच्चांक दिवसभरातील नीचांकी स्तर किती टक्के बदल
BSE Sensex 60,844.87 60,863.63 60,472.81 0.003
BSE SmallCap 28,138.33 28,210.57 28,081.74 0.11
India VIX 13.04 13.82 12.06 4.08
NIFTY Midcap 100 30956.65 31,036 65 30,846 75 0.0004
NIFTY Small 100 9,475.05 9, 491.05 9,433.90 0.04
NIfty smallcap 50 4,281.05 4,286.30 4,255.20 0.00
Nifty 100 17,723.85 17,751.65 17,625.25 0.00
Nifty 200 9,289.00 9,304.00 9,241.05 0.00
Nifty 50 17,893.45 17,916.90 17,779.80 0.00