sensex
मुंबई – दिवाळीच्या मुहूर्ताच्या सेन्सेक्सने चांगलीच उसळी मारली आहे. तसेच, निफ्टीही वाढला आहे. सेन्सेक्स जवळपास ६५१.१६ अंकांनी वाढला असून ५९,९५८.३१ अंकांवर स्थिरावला आहे. तर निफ्टी ५० अंकांनी वाढला आहे. ब्लॉक डील सत्र संध्याकाळी ५.४५ ते ६ वाजेपर्यंत असेल, तर प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी ६ ते ६.०८ पर्यंत असेल. असे मानले जाते की ‘मुहूर्त’ दरम्यान व्यवहार करणे शुभ आणि आर्थिक समृद्धी आणते असे म्हणतात. या मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजारातील व्यवहार एक तासासाठी होतात. ही मुहूर्त ट्रेडिंग त्या दिवशी संध्याकाळी होते.