एक बातमी... अन् शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला; गुंतवणूकदारांचे 4.41 लाख कोटींचे नुकसान!
शेअर बाजारासाठी शुक्रवारचा (ता.२) दिवस काहीसा अशुभ राहिला आहे. प्रामुख्याने अमेरिकी शेअर बाजारात काल (ता.१) मोठी घसरण झाली होती. याबाबतची माहिती समोर येताच आज भारतीय शेअर बाजार देखील पत्त्यासारखा कोसळला आहे. गेले दोन ते तीन दिवस 81,867.55 अंकांच्या उंच्चाकी पातळीवर व्यवहार करणारा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज (ता.२) 81000 अंकांच्या रेंगाळला आहे. तर निफ्टी देखील 25000 अंकांच्या खाली घसरलेला पाहायला मिळाला.
अमेरिकी शेअर बाजारात मोठी घसरण
अमेरिकी शेअर बाजारात काल (ता.१) मोठी घसरण झाली. परिणामी, आज खराब जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजार धुढुम… झाला आहे. गुरुवारी (ता.१) मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 81,867.55 अंकांवर बंद झाला होता. जो आज शेअर बाजार बंद होताना तब्बल ८८५.५९ अंकांनी घसरून, ८०,९८१.९५ अंकांपर्यंत खाली आला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी गुरुवारी 25000 अंकांच्या वरती बंद झाला होता. जो आज शेअर बाजार बंद होताना तब्बल 311 अंकांच्या घसरणीसह 24,699.50 अंकांवर बंद झाला आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : झोमॅटोचा जलवा..! वर्षभरात नफ्यात 2 कोटीवरून तब्बल 253 कोटीपर्यंत वाढ; शेअरमध्येही तेजी!
कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?
भारतीय शेअर बाजारात आज झोमॅटोच्या शेअर चांगलाच जलवा पाहायला मिळाला आहे. झोमॅटोचा शेअर आज १९ टक्क्यांनी वधारला असून, आज शेअर बाजारात कंपनीचे शेअर २७८.७ रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय आजच्या ट्रेडिंगमध्ये इन्फो एज ४.५८ टक्के, आयईएक्स २.५७ टक्के, इंडिया सिमेंट २.४१ टक्के, पेज इंडस्ट्रीज १.८७ टक्के, दिवीज लॅब १.४९ टक्के, पिरामल एंटरप्रायझेस १.४२ टक्के, एचडीएफसी बँक १.२४ टक्के, महानगर गॅस १.१९ टक्के, सन फार्मा १.१९ टक्के वाढीसह बंद झाले आहे.
याउलट सर्वाधिक घसरणाऱ्या शेअर्समध्ये कमिन्स 7.97 टक्के, एस्कॉर्ट्स कुबोटा 5.90 टक्के, बिर्लासॉफ्ट 5.86 टक्के, आयशर मोटर्स 4.87 टक्के, मारुती सुझुकी 4.74 टक्के, टाटा मोटर्स 4.71 टक्के, यूपीएल 4.08 टक्के, ट्रेंट 4.30 टक्क्यांनी सर्वाधिक घसरले आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)