1.77 लाखाचे झाले 984 कोटी रुपये, 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदार अल्पावधीत मालामाल!
स्मॉलकॅप कंपनी जेनसोल इंजिनिअरिंग जेनसोल इंजिनियरिंगचा शेअर सोमवारी 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 854.90 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने म्हटले की दुबईमध्ये 23 मेगावॅट पीक रूफटॉप सोलर प्रकल्प मिळाला आहे. जेनसोल इंजिनिअरिंगने त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, त्यांना हे कंत्राट यूएई स्थित डिक्लाइन एनर्जी डेव्हलपमेंट कंपनीकडून मिळाले आहे. जेनसोल इंजिनिअरिंगने मागील 3 वर्षात दोनदा भागधारकांना बोनस शेअर्स दिले आहेत. गेल्या 4 वर्षात कंपनीचे शेअर्स 4100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
किती आहे प्रकल्पाची किंमत
या करारांतर्गत जेनसोल इंजिनिअरिंग रुफटॉप सोलर फोटोव्होल्टेइक प्रणालीचे डिझाइन, बांधकाम आणि दीर्घकालीन ऑपरेशन आणि देखभाल यांसारख्या सेवा प्रदान करेल. या रूफटॉप सोलर प्रकल्पाची किंमत 186 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प 20 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. जेनसोल इंजिनिअरिंगने 8 ऑक्टोबर रोजी एक्सचेंजेसला सांगितले होते की, त्यांची सौर अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम सेवा ऑर्डर बुक 4097 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
शेअर्सचा परतावा
गेल्या 4 वर्षात जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स 4170 टक्के वाढले आहेत. 21 ऑक्टोबर 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 19.73 रुपयांवर होते. 14 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर्स 854.90 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 3 वर्षांत जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये 2550 टक्के वाढ झाली आहे. 14 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 31.80 रुपयांवर होते. 14 ऑक्टोबर 2024 रोजी जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स 854.90 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1377.10 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 720 रुपये आहे.
दोनदा बोनस शेअर्स
जेनसोल इंजिनिअरिंगने गेल्या 3 वर्षात दोनदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने भागधारकांना 1:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 3 शेअर्समागे 1 बोनस शेअर वितरित केला. कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 2 शेअर्समागे 1 बोनस शेअर दिला.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)