Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

Share Market Update: आज शेअर बाजारात काय घडणार याची गुंतवणूकदारांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. याबाबत आज शेअर बाजारातील तज्ज्ञांनी काही माहिती दिली आहे. आज कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत देखील त्यांनी सांगितलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2026 | 08:36 AM
Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • बाजार उघडण्याआधी मोठा संकेत!
  • आजचा शेअर बाजार कसा असणार?
  • गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ठरणार का महत्त्वाचा?
India Share Market Update: ७ जानेवारी म्हणजेच आज गुंतवणूकदारांनी अतिशय सावध भुमिका बाळगावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. आशियाई बाजारांमधून येणाऱ्या मिश्र संकेतांमुळे, भारतीय शेअर बाजार आज बुधवारी सपाट ते नकारात्मक स्थितीत उघडण्याची अपेक्षा आहे. गिफ्ट निफ्टीमधील सुरुवातीच्या ट्रेंडने भारतीय निर्देशांकांसाठी नकारात्मक सुरुवात दर्शविली, गिफ्ट निफ्टी २६,२१४.५ वर व्यवहार करत होता, जो मागील निफ्टी फ्युचर्स बंदपेक्षा ६७ अंकांनी किंवा ०.२५% ने कमी होता.

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

मंगळवार, ६ जानेवारी रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे दोन्ही निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी घसरले. सेन्सेक्स ५०० अंकांपेक्षा जास्त किंवा ०.६०% पेक्षा जास्त घसरून ८४,९००.१० च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला, तर निफ्टी ५० ०.५०% घसरून २६,१२४.७५ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दोन्ही बेंचमार्क्सनी बंद होताना काही तोटे टाळले, सेन्सेक्स ३७६ अंकांनी किंवा ०.४४% ने कमी होऊन ८५,०६३.३४ वर बंद झाला आणि निफ्टी ५० ७२ अंकांनी किंवा ०.२७% ने घसरून २६,१७८.७० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी-विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली. वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदार टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स, एचडीएफसी लाईफ आणि रेडिंग्टन या शेअर्सची आज खरेदी-विक्री करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदार आयपीसीए लॅबोरेटरीज, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस, डॉ. अग्रवाल हेल्थ केअर, अपोलो टायर्स आणि पेट्रोनेट एलएनजी या शेअर्सची आज खरेदी करू शकतात.

8th Pay Commission Delay: आठवा वेतन आयोग अस्तित्वात, पण कार्यालय नाही! कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम कायम 

शेअर बाजारातील तज्ज्ञांनी अशा १० स्टॉक्सची शिफारस केली आहे, जे २०२६ मध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ज, कॅनरा बँक, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, हिंदुस्तान कॉपर आणि लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड, सॅजिलिटी लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, टायटन कंपनी लिमिटेड हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना २०-५०% परतावा देण्याची शक्यता आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today at 7 january 2025 know about the experts advice share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध
1

जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू
2

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर, गाठला कळस; रेकॉर्डब्रेक आकड्यांवर उघडले NIFTY
3

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर, गाठला कळस; रेकॉर्डब्रेक आकड्यांवर उघडले NIFTY

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी की मंदी? आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय घडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे अंदाज
4

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी की मंदी? आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय घडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.