Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येत्या आठवड्यात शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार; ‘या’ कारणामुळे असेल सुट्टी!

अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चचा नवीन अहवाल नुकताच समोर आला. ज्यात अदानी समूह प्रकरणात सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचे नाव गोवण्यात आले आहे. त्यामुळे आता येत्या आठवड्यात त्याचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळणार आहे. शेअर बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता येत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार हा तीन दिवस बंद राहणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 11, 2024 | 06:06 PM
येत्या आठवड्यात शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार; 'या' कारणामुळे असेल सुट्टी!

येत्या आठवड्यात शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार; 'या' कारणामुळे असेल सुट्टी!

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, भारतीय शेअर बाजाराला मोठा हिंदोळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता पुढील आठवड्यात शेअर बाजाराला तीन दिवस सुट्टी असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गुरुवारच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे बँकांना तसेच शेअर बाजाराला पुढील आठवड्यात सुट्टी असणार आहे. तर १७ आणि १८ ऑगस्टला शनिवार, रविवार असल्याने शेअर बाजार बंद असणार आहे.

गुरुवारी राष्ट्रीय सणाची सुट्टी

पुढील आठवड्यात गुरुवारी देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत या राष्ट्रीय सणानिमित्त संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सणाची सुट्टी असणार आहे. बँका आणि शाळांसोबतच शेअर बाजारही बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवारी आठवडी सुट्टी असल्याने शेअर बाजार बंद राहणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजार बंद असल्याने इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, एसएलबी, करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह बाजार बंद राहतील.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : …हा तर चिखल फेकण्याचा प्रयत्न, आरोपांमध्ये नाही दम; हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया!

ऑगस्ट महिन्यात इतके दिवस बाजाराला असेल सुट्टी

– 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनी शेअर बाजार बंद राहणार.
– 17 ऑगस्ट – शनिवार असल्याने सुट्टी असेल.
– 18 ऑगस्ट – रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सुट्टी असेल.
– 24 ऑगस्ट – शनिवार असल्याने सुट्टी असेल
– 25 ऑगस्ट – रविवार असल्याने सुट्टी असेल.
– 31 ऑगस्ट – शनिवार असल्याने सुट्टी असेल

देशभरातील बँकांनाही असेल सुट्टी

15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशात सुट्टी असेल. 18 ऑगस्ट रोजी रविवारची सुट्टी असेल. 19 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे अहमदाबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ या शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. त्याच वेळी 20 ऑगस्ट रोजी श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त कोची आणि तिरुअनंतपुरममधील बँकांना सुट्टी असणार आहे.

Web Title: Share market holiday stock market will be closed for three days in the coming week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 06:06 PM

Topics:  

  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस
1

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!
2

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Share Market Today: कसा असणार आज शेअर बाजाराचा मूड? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? जाणून घ्या
3

Share Market Today: कसा असणार आज शेअर बाजाराचा मूड? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? जाणून घ्या

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी
4

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.