Share Market: 'हे' 10 शेअर्स देऊ शकतील कमी वेळेत जास्त परतावा, कोणते आहेत शेअर्स वाचा एका क्लिकवर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
March Top 10 Shares Marathi News: गेल्या एका महिन्यात सेन्सेक्सने ४२१६ अंकांनी किंवा ५.७६ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी, निफ्टी ५० मध्ये १३९४ अंकांनी म्हणजेच ६.३० टक्के वाढ झाली. या काळात, निफ्टी ५०० चे १० स्टॉक मार्चचे सिकंदर असल्याचे सिद्ध झाले. यातून ३२ ते ४६ टक्क्यांपर्यंत मोठा परतावा मिळाला. या टॉप-१० स्टॉकमध्ये पीटीसी इंडस्ट्रीज, जेन टेक्नॉलॉजी, जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज, ट्रान्सफॉर्मर अँड रेक्टिफायर इंडिया, चेन्नई पेट्रो, एचएएल, एचईजी, जीआरएसई, अदानी ट्रान्समिशन आणि ज्योती सीएनसी यांचा समावेश आहे.
मार्चमध्ये पीटीसी इंडस्ट्रीजच्या प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना ४७४० रुपये परतावा मिळाला. या कालावधीत, हा स्टॉक ६४.४५% वाढून १४९४५ रुपयांवर पोहोचला आहे.
ड्रोनविरोधी उत्पादन करणारी संरक्षण कंपनी झेन टेकचे शेअर्स मार्चमध्ये वाढले. यामध्ये ४१.४५ टक्क्यांची वाढ झाली आणि ती १४७९ रुपयांवर पोहोचली.
निफ्टी ५०० स्टॉक्सच्या टॉप-१० यादीत जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज तिसऱ्या स्थानावर आहे. मार्च महिन्यात त्यात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आता हा शेअर २२९८६ रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर अँड रेक्टिफायर इंडियाचे शेअर्स ५३६.२० रुपयांवर बंद झाले. मार्चमध्ये त्यात ३९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे
चेन्नई पेट्रोलियम कॉपर्पोरेशनच्या शेअर्समध्ये एका महिन्यात ३६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वाढीसह, हा शेअर ६१५.१० रुपयांवर पोहोचला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे शेअर्स मार्चच्या टॉप-१० मध्ये देखील समाविष्ट आहेत. एका महिन्यात यामध्ये ३५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी एचएएलचा शेअर ४१७७ रुपयांवर बंद झाला आणि मार्चमध्ये त्याने प्रति शेअर १०८९ रुपयांचा परतावा दिला आहे.
या स्टॉकने एका महिन्यात सुमारे ३५% परतावा दिला आहे. शुक्रवारी तो ४८२.८५ रुपयांवर बंद झाला.
हा स्टॉक मार्चच्या टॉप-१० निफ्टी ५०० मध्ये सुमारे ३४ टक्क्यांच्या वाढीसह सामील झाला आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचे शेअर्स १४८६ रुपयांवर पोहोचले आहेत.
अदानी ट्रान्समिशनने मार्चमध्येही सिकंदर असल्याचे सिद्ध केले. सुमारे ३४ टक्के भरीव परतावा देऊन तो ८७२ रुपयांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला.
१०५९ रुपयांवर पोहोचलेल्या ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या शेअर्सनी मार्चमध्ये ३२ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.