
Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याचे संकेत, बाजार उघडताच गुंतवणूकदारांना बसणार धक्का?
मंगळवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,७०० च्या वर राहिला. सेन्सेक्स २५०.४८ अंकांनी म्हणजेच ०.३०% ने घसरून ८३,६२७.६९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ५७.९५ अंकांनी म्हणजेच ०.२२% ने घसरून २५,७३२.३० वर बंद झाला. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार इन्फोसिस, ग्रो, एचडीएफसी एएमसी, वारी रिन्यूएबल, लार्सन अँड टुब्रो, टाटा एलेक्ससी, आयसीआयसीआय लोम्बार्ड, जस्ट डायल, ५पैसे कॅपिटल, एनएलसी इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंटरॅक बिल्डिंग सोल्युशन्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. पारेख यांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये अपोलो हॉस्पिटल्स, श्रीराम फायनान्स आणि टेक महिंद्रा यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. बगडिया याांनी शिफारस केलेल्या आजच्या स्टॉक्समध्ये जमना ऑटो इंडस्ट्रीज, डीसीबी बँक, सीएसबी बँक, बजाज कंझ्युमर केअर आणि टेक महिंद्रा यांचा समावेश आहे.
सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) बाजारातील या तज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या स्टॉक्समध्ये ऑइल इंडिया लिमिटेड, वेदांत लिमिटेड, मॅनकाइंड फार्मा लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, टीडी पॉवर सिस्टम्स लिमिटेड आणि इटरनल लिमिटेड यांचा समावेश आहे. गणेश डोंगरे यांनी मॅनकाइंड फार्माचे शेअर्स ₹ २,२१६ ला खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शिजू कुथुपलक्कल यांनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स ₹ ३६२.८० ला खरेदी करण्याची शिफारस केली आहे.