Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी, बड्या वकिलांकडून समर्थन अन् चित्र पालटले!

शेअर बाजारात आज उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. अदानी ग्रीन एनर्जीसह अदानी ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 27, 2024 | 03:03 PM
अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी, बड्या वकिलांकडून समर्थन अन् चित्र पालटले!

अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी, बड्या वकिलांकडून समर्थन अन् चित्र पालटले!

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात आज उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. अदानी ग्रीन एनर्जीसह अदानी ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली आहे. अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर या घडामोडी पाहायला मिळाल्या. चेअरमन गौतम अदानी, सागर अदानी, अदानी ग्रीनचे एमडी आणि सीईओ विनीत जैन यांनी अमेरिकेतील न्याय विभागाच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.

अदानी ग्रीनच्या दाव्यानुसार लाचखोरी प्रकरणात गौतम अदानी आणि सागर अदानी यांचे नाव नसल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या या स्पष्टीकरणानंतर अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी : 6.62 टक्के
अदानी एंटरप्रायझेस : 6.02 टक्के
अदानी एनर्जी सोल्युशन्स : 9.70 टक्के
अदानी टोटल गॅस लिमिटेड : 8.81 टक्के
अदानी पोर्ट्स : 2.91 टक्के
अदानी विल्मार : 4.67 टक्के
अदानी पॉवर : 7.88 टक्के
सांघी इंडस्ट्रीज :1.97 टक्के
एनडीटीव्ही :4.30 टक्के
अंबुजा सिमेंट : 2.29 टक्के

अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये मंगळवारी घसरण पाहायला मिळाली होती. आज दुपारी 12 वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिली असता अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर 920.75 रुपयांवर होता. तर, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 2223.40 रुपयांवर होता. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर 636.50 रुपयांवर होता.

हे देखील वाचा – ‘या’ मुस्लिम देशात भारतीय खरेदी करतायेत सर्वाधिक घरे; कारण ऐकून अंचबित व्हाल…

शेअरमध्ये तेजी का?

अदानी ग्रीन एनर्जीच्या दाव्यानुसार लाचखोरी प्रकरणात गौतम अदानी, सागर अदानी यांचं नाव अमेरिकीतील प्रकरणात नाही. ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की,क्रमांक 1 आणि 5 इतरांपेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मात्र, यामध्ये क्रमांक 1 मध्ये गौतम अदानी आणि सागर अदानी सोडून इतरांवर आरोप आहेत. केवळ अज्यूर आणि सीडीपीक्यू च्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे, असे रोहतगी म्हणाले आहे.

अमेरिकेतील न्याय विभाग, अमेरिका प्रतिभूति आणि विनिमय आयोग कंपनी लाचखोरी प्रकरणात चौकशी करत आहे. अदानी ग्रुपने आरोप फेटाळत बीएसई आणि एनएसईवर त्यांची भूमिका मांडली आहे.

हे देखील वाचा – एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन; उद्योग जगतावर शोककळा!

दरम्यान, मानांकन संस्था मुडीजने अदानी ग्रुपच्या 7 कंपन्यांचं रेटिंग स्थिरवरुन नकारात्मक केले होते. अदानी पोर्टस अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन स्टेप वन लिमिटेड, अदानी ट्रान्सपोर्टेशन, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, अदानी इंटरनॅशनल कंटेन टर्मिनल या कंपन्यांच्या रेटिंगबाबत मुडीजने निर्णय घेतला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Shares of adanis companies rise by 10 percent support from big lawyers and the picture changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • Gautam Adani

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: ओडिसाचे सरकार अदानी  चालवत आहेत:  राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
1

Rahul Gandhi News: ओडिसाचे सरकार अदानी चालवत आहेत: राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Thane News : गौतम अदानींच्या फोटो मारले जोडे ; महावितरण प्रशासनाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक
2

Thane News : गौतम अदानींच्या फोटो मारले जोडे ; महावितरण प्रशासनाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक

गौतम अडाणीला बसला मोठा झटका, सरकारने कोर्टाला नोटीस बजावण्याचे दिले आदेश
3

गौतम अडाणीला बसला मोठा झटका, सरकारने कोर्टाला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, राज्यात गँग अन्…; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल
4

राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, राज्यात गँग अन्…; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.