'या' मुस्लिम देशात भारतीय खरेदी करतायेत सर्वाधिक घरे; कारण ऐकून अंचबित व्हाल...
भारतात मालमत्तेचे दर गगनाला भिडत आहेत. खासकरून जर देशातील टॉप 5 शहरांमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर दर ऐकून तुम्हाला चक्कर येऊ शकतात. मात्र, त्यानंतरही देशातील लोक केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी करत आहेत. याच पार्श्वभुमीवर आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या ठिकाणी भारतीय सर्वात जास्त प्रॉपर्टी खरेदी करतात.
भारतीय कोणत्या देशात सर्वाधिक मालमत्ता खरेदी करतात?
नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, ग्रीस जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. ज्या ठिकाणी भारतीय सर्वाधिक मालमत्ता खरेदी करतात. तर, तुर्की दुसऱ्या स्थानावर आहे. या देशातही भारतीय लोक मालमत्तेत मोठी गुंतवणूक करत आहेत. तुर्कस्थानमध्ये जवळपास ९९ टक्के लोक इस्लामला मानतात. तिसऱ्या क्रमांकावर कॅरेबियन देश आहेत. ज्या ठिकाणी भारतीय मालमत्तांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात. याशिवाय माल्टा आणि स्पेनमध्येही भारतीय मोठ्या प्रमाणावर घरे खरेदी करत आहेत.
भारतीय इतर देशांत घरे का खरेदी करत आहेत?
इतर देशांत मालमत्ता खरेदी करताना भारतीयांचा पहिला विचार गोल्डन व्हिसा मिळवणे हा असतो. याशिवाय, भारतीय लोकांमध्ये नेहमीच एक गोष्ट असते की त्यांना परदेशातही स्वतःचे घर हवे आहे. कोणत्याही देशाने त्यांना घर खरेदी करण्याची संधी दिली तर भारतीय तेथे गुंतवणूक करतात. ब्रिटन आणि सौदी अरेबिया सारखे देश याची उत्तम उदाहरणे आहेत. सर्वसामान्य भारतीयांशिवाय बड्या स्टार्सनीही या देशांमध्ये घरे खरेदी केली आहेत.
भारतीय ग्रीसमध्ये सर्वाधिक गुंतवणूक का करतात?
वास्तविक, ग्रीसने 2013 मध्ये गोल्डन व्हिसा प्रोग्राम सुरू केला. यानुसार, रिअल इस्टेट, सरकारी रोखे किंवा इतर मंजूर साधनांमध्ये किमान €250,000 (रु. 2,21,70,250) गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला ग्रीक सरकार गोल्डन व्हिसा जारी करेल. ग्रीस व्यतिरिक्त संयुक्त अरब अमिराती (UAE), ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांसारखे देश देखील छोट्या गुंतवणुकीवर गोल्डन व्हिसा देतात.