6 महिन्यांत 181 टक्के परतावा; 52 आठवड्यांच्या उच्च पातळीला पोहोचलाय पेटीएमचा शेअर!
पेटीएमची उपकंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सच्या शेअरच्या दरात आज (ता.३०) १२ टक्क्यांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवारी (ता.५) पेटीएमच्या शेअर्सची किंमत ५५८ रुपये होती. आज गुंतवणुकदारांनी शेअर्सच्या खरेदीचा सपाटा सुरू ठेवल्यामुळे सुरुवातीला शेअरच्या किंमतीमध्ये १४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. आज शेअर बाजार बंद होताना ६३१ वर गेलेला शेअरचा दर, ६२४.९० वर आला आहे. आज दिवसभरात पेटीएमच्या शेअरच्या किंमतीमध्ये ७०.४० रुपयांची वाढ झाली आहे.
डाउनस्ट्रीम गुंतवणुकीला केंद्राची परवानगी
पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये डाउनस्ट्रीम गुंतवणुकीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याची घोषणा वन ९७ कम्युनिकेशन्स कंपनीने गुरूवारी (ता.२९) केली होती. तसेच पेमेंट ॲग्रीगेटर म्हणून पेटीएम पुन्हा एकदा अर्ज करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. त्याचा थेट परिणाम आज कंपनीच्या शेअर वाढीवर पाहायला मिळाला आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलताना क्युआर कोड आणि साऊंड बॉक्स तंत्रज्ञानाचे कौतुक केले. या तंत्रज्ञानामुळे भारतात फिनटेक क्रांती झाली, असे ते म्हणाले.
हेही वाचा – 3000 रुपये भांडवलात, बेरोजगार तरुण बनला करोडपती व्यावसायिक; वाचा… त्याची यशोगाथा!
We are humbled by the opportunity our country has given us to pioneer QR code payments, along with our innovative Soundbox and card machines. These technologies have built trust in mobile payments across every nook and corner of our nation among customers and merchant partners,… pic.twitter.com/Tc3baiwQT2
— Paytm (@Paytm) August 30, 2024
पेटीएमने मानले पंतप्रधान मोदींचे आभार
पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा व्हिडीओ पेटीएमने एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले, साऊंडबॉक्स आणि क्युआर कोड पेमेंटची स्तुती केल्याबद्दल धन्यवाद. या तंत्रज्ञानामुळे व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये मोबाइल पेमेंटबद्दल विश्वास निर्माण झाला. देशाच्या कानाकोपऱ्यात हे तंत्रज्ञान स्वीकारले गेले. ज्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.
तीन महिन्यात पटीएमच्या शेअरमध्ये ६५ टक्क्यांची वाढ
मागच्या सहा महिन्यात पेटीएमचा शेअरमध्ये ५३ टक्के तर तीन महिन्यात ६५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप आता ३९,६०० कोटींवर पोहोचले आहे. कंपनीमध्ये आता १०० टक्के सामान्य भागधारकांची भागीदारी आहे.