India's External Affairs Minister S. Jaishankar on 3-day visit to Russia
India Russia News in marathi : नवी दिल्ली/ मॉस्को : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या रशिया (Russia) दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 19 ते 21 ऑगस्ट हा दौरा आहे. हा दौरा भारत आणि रशियाच्या संबंधाना एक नवी चालना देणार आहे.एस. जयशंकर याचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ (Tarrif) लादले आहे. तसेच रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्यावरही निर्बंध आणि दंडही लादला आहे. यामुळे हा दौरा धोरणात्मक दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
यावेळी एस. जयशंकर (S. Jaishankar) मॉस्कोमध्ये होणाऱ्या २६व्या भारत रशिया सहकार्यावरील आंतर-सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. या परिषदेत भारत आणि रशियामधील, व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक संबंधावर चर्चा होईल. यावेळी एस. जयशंकर यांच्यासोबत रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह देखील या परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत.
या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियामध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी एस. जयशंकर भारत आणि रशिया व्यापाराला संबोधित करणार आहेत. गुंतवणूक आणि व्यापार वाढीवर दोन्ही देशांमध्ये भर दिला जाणार आहेत. भारताचे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधान गती देण्यावर भर दिला जाईल.
यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील रशियाला भेट दिली होती. गेल्या काही काळात भारत आणि रशियामध्ये राजनैतिक संबंधावर सतत चर्चा सुर आहे. यामुळे एस. जयशंकर यांचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
शिवाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) भारताला लवकरच भेट देण्याची शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) याचंया निमंत्राणवरुन हा दौरा होणार आहे. यामुळे एस. जयशंकर यांचा दौरा भारत आणि रशियामधील दीर्घकालीन सहकार्याला नवी दिशा देईल. यासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे.
याच वेळी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना दोन दिवसांपूर्वी फोन केला होता. यावेळी त्यांनी अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा माहिती पंतप्रधान मोदींना दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युद्धावर शांततेने तोडगा काढण्याची भारताची ठाम भूमिका स्पष्ट केली. तसेच भारत रशियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही स्पष्ट केले. पुतीन आणि ट्रम्प यांची बैठक अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्यावर झाली होती. अमेरिकेने भारटावर टॅरिफ लादल्यानंतर अमेरिका व भारतात संबंध थोडे ताणले गेले आहेत. त्यामुळे भारत रशिया व चीन सोबत संबंध दृढ करण्यावर भर देत आहे.
गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?