श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा निकाल (फोटो सौजन्य - Website)
वैविध्यपूर्ण विक्रीच्या जोरावर श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने एप्रिल-डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत रिटेल विमा विभागात आपला नवीन व्यवसाय तब्बल ८६५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची चमकदार कामगिरी केली आहे. गत वर्षाच्या याच कालावधीतील व्यवसायाच्या तुलनेत यंदाचा व्यवसाय ४९ टक्क्यांनी अधिक आहे.
कंपनीने आपले लक्ष केंद्रित केलेला वैयक्तिक नवीन व्यवसाय एपीई मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर २०२४ या कालावधीत तब्बल ४९ टक्क्यांनी वाढला आहे. खासगी उद्योगाच्या १९ टक्के वाढीपेक्षा कंपनीच्या वाढीचा वेग अधिक राहिला आहे. एप्रिल-डिसेंबर २०२४ या कालावधीत कंपनीचे एकूण प्रीमियम संकलन वार्षिक २१ टक्क्यांनी वाढून २,७८२ कोटी रुपयांवर झेपावले आहे.
तिसऱ्या तिमाहीतील लाभ
तिसऱ्या तिमाहीत कंपनीला समूह व्यवसायातून मिळालेला प्रीमियम दुसऱ्या तिमाहीपेक्षा दुप्पट झाला आहे. त्यामुळे तो १७४ कोटी रुपयांवरून ३३६ कोटी रुपयांवर झेपावला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीला ३२२ कोटी रुपयांचे वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम उत्पन्न मिळाले आहे. वैयक्तिक आणि गट पॉलिसींसाठीचे नूतनीकरण प्रिमीयम गेल्या तिमाहीतील ४४७ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ४९४ कोटी रुपयांवर झेपावले आहे. दुसऱ्या तिमाहीतील ९५२ कोटी रुपयांचा एकूण प्रीमियम २१ टक्क्यांनी वाढून तिसऱ्या तिमाहीत १,१५१ कोटी रुपयांवर झेपावला आहे.
आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत नवीन वैयक्तिक व्यवसाय प्रीमियम गत वर्षाच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी वाढून ३२२ कोटी रुपयांवर झेपावला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे नवीन वैयक्तिक व्यवसाय प्रीमियम संकलन २३७ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत नवीन वैयक्तिक व्यवसाय एपीई (वार्षिक प्रीमियम समतुल्य) ३६ टक्क्यांनी वाढून ३०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने २२१ कोटी रुपयांचा एपीई व्यवसाय केला होता.
गुंतवणुकीसाठी FD अजूनही एक चांगला पर्याय, केंद्र सरकारने टीडीएस मर्यादाही वाढवली
काय म्हणाले एमडी
श्रीराम लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ कॅस्परस जे. एच. क्रोमहॉट म्हणाले, ” अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे त्याचबरोबर त्यांना विमा कवचाआधारे सुरक्षित करण्याबाबतची आमची वचनबद्धता या तिमाही निकालातून दिसून येते. समाजातील विविध घटकांना परवडणाऱ्या जीवन विमा योजनांची गरजसुद्धा या निकालातून प्रतिबिंबित होते. सुलभ तसेच व्यापक विमा उपाय प्रदान करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचा प्रभाव आमच्या तिमाही निकालातील कामगिरीतून अधोरेखित होता. या प्रभावातून अधिकाधिक कुटुंबांना विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक सुरक्षिततेची खात्री मिळते.”
“ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्रीराम लाईफ पूणपणे समर्पित आहे. ग्रामीण भागातील कोणतेही कुटुंब मागे राहणार नाही, याची आम्ही पूरेपूर काळजी घेतो. आमचे पॉलिसीधारक कुठेही राहत असले तरी त्यांना अखंड सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो,” अशीही टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
कंपनीचा सॉल्व्हेंसी रेशो १.७६ आहे. तर आर्थिक वर्ष २४ साठीचा दावेपुर्ती (क्लेम सेटलमेंट) रेशो ९८% होता. त्यामध्ये संपूर्ण कागदपत्रे सादर केल्यापासून १२ तासांच्या आत चौकशी न केलेले दावेसुद्धा निकाली काढले गेले.
दिल्लीत फुललेलं कमळ शेअर बाजारात ‘अच्छे दिन’ आणणार का? जाणून घ्या एक्सपर्टसचे म्हणणे
नवीन योजनांचा शुभारंभ
श्रीराम ग्रुप आणि आफ्रिकेचा सॅनलम समुह श्रीराम लाईफचे मुख्य प्रवर्तक आहे. कंपनी प्रामुख्याने ग्रामीण आणि मध्यम उत्पन्न गटाला सेवा प्रदान करते. या श्रेणीतील बहुतांश ग्राहक पहिल्यांदाच विमा योजनांची खरेदी करणारे आहेत. गत तिमाहीत श्रीराम लाईफने सुनिश्चित लाभ या नवीन योजनेचा शुभारंभ केला. ही थेट विम्यात सहभाग नसलेली वैयक्तिक बचत योजना असून ती एकूण भरलेल्या प्रीमियमच्या 668% पर्यंत उच्च परताव्यांची हमी देते. या योजनेत 30 दिवसांपासून 60 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील व्यक्तींना अगदी सहजरित्या सहभागी होते येते. या योजनेसाठी किमान गुंतवणूक रक्कमेचा हप्ता वार्षिक 30,000 रु, अर्धवार्षिक 15,500 रु , तिमाही 8,000 रु आणि मासिक 3,000 रुपये असा आहे.
तपशील | तिसरी तिमाही वित्त वर्ष 25 | दुसरी तिमाही
वित्त वर्ष25 |
YTD तिसरी तिमाही वित्त वर्ष 25 | तिसरी तिमाही वित्त वर्ष 24 | YTD तिसरी तिमाही वित्त वर्ष Y24 |
नवीन व्यवसाय प्रीमियम (वैयक्तिक) | 322 | 331 | 865 | 237 | 581 |
नवीन व्यवसाय एपीई (वैयक्तिक) | 301 | 308 | 807 | 221 | 544 |
समूह | 336 | 174 | 708 | 178 | 693 |
नूतनीकरण प्रीमियम (इंडिव्ह + ग्रुप) | 494 | 447 | 1209 | 427 | 1029 |
एकूण प्रीमियम | 1151 | 952 | 2782 | 841 | 2304 |
करोत्तर नफा | 43 | 23 | 94 | 50 | 121 |
एकूण एयूएम | 12791 | 10626 | |||
दाव्यांचे निराकरण | |||||
एकूण गणना (व्यक्ती + गट) | 12384 | 14960 | 43268 | 12330 | 34865 |
(सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये)