फोटो सौजन्य: iStock
आजही म्युचुअल फंड्स आणि शेअर मार्केट सारख्या गुंतवणूक पर्यायांमध्ये फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या चांगलीच आहे. आजकाल जरी FD मध्ये गुंतवणूक केल्यावर हवा तेवढा परतावा मिळत नसला, तरी हे एक सुरक्षित गुंतवणूक साधन मानले जाते. फिक्स डिपॉझिटची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यात जोखीम खूपच कमी असते, त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची मुख्य रक्कम सुरक्षित राहण्याची हमी असते. त्याचप्रमाणे, FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नियमितपणे निश्चित व्याज मिळत राहते. या सुरक्षिततेच्या कारणामुळे, अनेक आर्थिक सल्लागार FD मध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतात.
कोणत्याही वर्षाचा पहिला तिमाही कर बचत आणि गुंतवणूक निर्णयांसाठी महत्त्वाचा असतो. यावेळी आपण सर्वजण आर्थिक सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय घेतो. बाजारातील सततच्या चढउतारांमध्ये, FD हा स्थिरता, सुरक्षा आणि कर लाभ देणारा एक विश्वासार्ह आणि व्यावहारिक गुंतवणूक पर्याय आहे.
‘या’ आहेत Sensex मधील टॉप 10 व्हॅल्युएबल कंपन्या, ज्यांनी पैसे गुंतवले ते झाले मालामाल
अलिकडच्या अर्थसंकल्पीय घोषणांमुळे एफडी अधिक आकर्षक बनली आहे. सरकारने बँक एफडीसाठी टीडीएस मर्यादा वाढवली आहे. सामान्य नागरिकांसाठी ते ४० हजारांवरून ५० हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आले आहे. चला आज आपण, एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमुख फायदे जाणून घेऊया.
जागतिक राजकीय तणाव आणि व्याजदरांमधील चढउतारांमुळे बाजारात सध्या बरीच अनिश्चितता आहे. दीर्घकालीन नफ्याच्या शक्यतेमध्ये अल्पकालीन अस्थिरता गुंतवणूकदारांना चिंतेत टाकत आहे.
आयकर सवलत आणि रेपो दरातील कपात यावरही बाजार स्थिर नाही. अशा वेळी, एफडी हा एक मजबूत आधार म्हणून उदयास आला आहे. हे जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांना अस्थिरतेचा परिणाम न होता खात्रीशीर परतावा देते. नियमित उत्पन्नाच्या शोधात असलेल्या लोकांसाठी एफडी हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.
जर व्यवसाय असा असेल तर नोकरीची काय गरज? सकाळ-संध्याकाळ लागले ग्राहकांची रांग
एफडीमुळे बचतीसोबत टॅक्सवर देखील बचत होते. पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधी असलेल्या एफडीद्वारे आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत तुम्ही १.५ लाख रुपयांपर्यंतची वजावट मिळवू शकतात.
ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड से विंग स्कीम्स) आणि युलिप (युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स) सारख्या इतर कर-बचत साधनांच्या तुलनेत, एफडी त्यांच्या साधेपणामुळे आणि खात्रीशीर परताव्यामुळे अधिक चांगला ऑप्शन आहे.
ओव्हरड्राफ्ट सुविधा: आपत्कालीन आर्थिक परिस्थितीत, गुंतवणूक टिकवून ठेवताना आवश्यक निधी मिळविण्यासाठी एफडी एक उत्कृष्ट उपाय प्रदान करते. ओव्हरड्राफ्ट सुविधेद्वारे बँका हमी म्हणून एफडी स्वीकारून क्रेडिट लाइन प्रदान करतात.
ग्राहक एकूण एफडी रकमेच्या विशिष्ट टक्केवारीपर्यंत कर्ज घेऊ शकतात. वापरलेल्या रकमेवरच व्याज द्यावा लागतो. एफडी गॅरंटीमुळे, बँका सहसा स्पर्धात्मक व्याजदराने कर्ज देतात.