फोटो सौजन्य: iStock
आजच्या काळात, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय आहेत. आजकाल, लोक अगदी लहान गोष्टी खरेदी करण्यासाठी देखील ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करतात. परंतु, आता ग्राहक या प्लॅटफॉर्मवरून १०-२० रुपयांच्या बिस्किटे, चहा-कॉफीसारख्या छोट्या वस्तू ऑर्डर करू शकणार नाहीत. हे लगेच होणार नाही पण त्यासाठी तयारी आधीच सुरू झाली आहे.
खरंतर, रोजच्या वापरातील वस्तू (FMCG) बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी निर्णय घेतला आहे की ते या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लहान आणि परवडणाऱ्या पॅकचा पुरवठा करणार नाहीत. यामुळे लोकांना काही प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कंपन्यांच्या मते, हे पॅक फक्त किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असेल.
‘ही’ एक चूक आणि Zomato च्या मालकाला शाकाहारी लोकांची मागावी लागली माफी
मिळालेल्या माहितीनुसार, पार्लेने क्विक कॉमर्स कंपन्यांसाठी पार्ले-जी, हायड अँड सीक, क्रॅक जॅक सारखे बिस्किटांचे वेगवेगळे पॅक लाँच केले आहेत, ज्यांची किंमत ५०-१०० रुपयांच्या दरम्यान आहे. आता ३० रुपयांपर्यंतच्या पार्ले बिस्किटांचे पॅक फक्त किराणा दुकानातच उपलब्ध असतील.
याशिवाय, रिलायन्स आणि डीमार्ट सारख्या रिटेल चेन १२० ते १५० रुपयांच्या बिस्किटांचे पॅक विकतील. यासोबतच, आयटीसीने क्विक कॉमर्ससाठी एंगेज परफ्यूम, सॅव्हलॉन हँडवॉश आणि मंगलदीप अगरबत्तीचे अनेक वेगवेगळे पॅक लाँच केले आहेत. त्याच वेळी, अदानी विल्मर कंपनी क्विक कॉमर्ससाठी स्वयंपाकाच्या तेलाचे नवीन पॅक लाँच करण्याची तयारी केली आहे.
देशात ऑनलाइन ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत असल्याचे मानले जात आहे. यामुळे किराणा दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. किराणा दुकान मालक याविरुद्ध आवाज उठवत होते. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, एफएमसीजी कंपन्यांनी हा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आता या कंपन्या क्विक कॉमर्ससाठी विशेष पॅकेजिंग करत आहेत. अशा पॅकेजेसची किंमत किराणा दुकानात उपलब्ध असलेल्या किंमतीपेक्षा जास्त असतील.
‘सीझनही जवळ, गुंतवणूकही कमी’; लवकर सुरु करा ‘हा’ व्यवसाय, ‘कमाई होईल अफाट, पैशांनी भरेल कपाट’
सध्या, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लहान पॅकची विक्री वेगाने वाढत आहे. तथापि, कंपन्यांनी हे पॅक या प्लॅटफॉर्मसाठी नाही तर फक्त दुकानदारांसाठी बनवले आहे. आता किराणा दुकानातून हे पॅक विकले जात नाहीत, त्यामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. किराणा दुकानांशी होणारे संघर्ष टाळण्यासाठी, क्विक कॉमर्ससाठी वेगळे पॅकेजिंग सुरू करण्याचा निर्णय घेणयात आला आहे.
शहरी मागणी कमी झाल्यामुळे, FMCG कंपन्यांचे उत्पन्न कमी झाल्याचे दिसून येते. उलट, देशातील ग्रामीण भागात मागणी वाढली आहे. हेच कारण आहे की या कंपन्या गावं आणि शहरांसाठी वेगवेगळ्या किंमतींसह उत्पादन कॅटेगरी विकसित करत आहेत. अलीकडेच अनेक कंपन्यांनी मोठ्या पॅकमध्ये उपलब्ध असलेल्या पॅकपेक्षा कमी प्रमाणात प्रीमियम उत्पादनांचे छोटे पॅक लाँच केले आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनने या नवीन उपक्रमाचे स्वागत केले आहे. परंतु, फेडरेशनचे म्हणणे आहे की एफएमसीजी कंपन्यांचा हा उपक्रम तेव्हाच अर्थपूर्ण आहे जेव्हा त्यांनी एकाच उत्पादनाच्या दोन कॅटेगरी तयार केल्या. जर एखाद्या उत्पादनाची किंमत वाढवून आणि नंतर सवलत देऊन विक्री केली तर ग्राहकांना तोटा सहन करावा लागतो.