देशात गिग वर्कर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आता सरकार देखील क्विक कॉमर्समध्ये कार्यरत असणाऱ्या गिग वर्कर्ससाठी पेन्शन चालू करण्याचा विचार करत आहे.
आता क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बिस्किटे, चहा, कॉफी इत्यादी उत्पादनांचे छोटे पॅकेट ऑर्डर करता येणार नाहीत. या प्लॅटफॉर्मसाठी एफएमसीजी कंपन्या स्वतंत्र उत्पादन पॅक लाँच करण्याच्या तयारीत आहे.
2022 मध्ये भारतातील क्विक कॉमर्सचा व्यवसाय दोन अब्ज डॉलरचा होता, जो 2024 मध्ये वाढून $6.1 अब्ज होईल. आता 2030 पर्यंत हाच आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
देशातील क्विक कॉमर्स क्षेत्रात कमालीची वाढ होत असताना आता ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन इंडिया डिसेंबरच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपली क्विक डिलिव्हरी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी क्विक कॉमर्स कंपन्यांबाबत इशारा दिला आहे. या कंपन्यांमुळे किरकोळ विक्रेत्यांना फटका बसत असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे.