फोटो सौजन्य - Social Media
रोज बॉसच्या ओरडण्याचा कंटाळा आलाय. मग आता वेळ आहे, स्वतः बॉस बनण्याची. दररोज इतरांसाठी झटत आहात आणि दिनरात काबाडकष्ट करून हातामध्ये काय येतं? दिडक्या. अर्ध्यापेक्षा जास्त जणांचे यात निवाराही होत नाही. मग आता स्वतः राजा बनण्याची वेळ आली आहे. मुळात, सीझनही जवळ आला आहे. कसला? अहो, कैरीचा. आता या सीझनचा फायदा घ्या आणि रक्कमेने नफा कमवा. ही बिझनेस टीप, नक्कीच तुमच्या फायद्यात येणार आहे आणि हा फायदा नक्कीच तुमच्या अनेक स्वप्नांची पूर्ती करणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ‘या’ फायद्याच्या व्यवसायाबद्दल:
दीड महिन्यात उन्हाळा उंबरठ्यावर येतं आहे. आंब्याच्या झाडांना मोहर फुटण्यास सुरुवात होणार आहे. कैरीचा ऋतू आपले दार ठोकवण्यास तयार होत आहे. आपल्याला याच काळाचा फायदा घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक घरांमध्ये लोणचे बनवले जातात. परंतु, आताच्या व्यस्थ जीवनशैलीत कमीच घरे आहेत, ज्यांना या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळतो. तर याचा फायदा घेत आपण अशा व्यस्थ लोकांसाठी कामे करू शकतो आणि योग्य नफा काढू शकतो. कैरीचे लोणचे बनवण्याचा हा व्यवसाय अगदी उत्कृष्ट आहे. गृहिणी असो वा जॉब करणारे महिला, त्याही या व्यवसायातून स्वतःची एक वेगळी ओळख तयार करू शकतात.
दहा हजारांची गुंतवणूक करून आपण या व्यवसायात पाऊल ठेऊ शकतो. जर गुंतवणूक जास्त असले तर नफाही जास्त असेल. परंतु, जर तुम्हाला ३०,००० रुपये ते ४०,००० रुपये इतके काढायचे आहेत तर दहा हजार रक्कम पुरेशी आहे. तुम्ही तयार केलेलं लोणचे ऑनलाईन किंवा रिटेल मार्केटमध्ये विक्री करू शकता. तसेच स्वतःचा ब्रँडही तयार करू शकता. शासनाकडून, व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा आणि सोयी पुरवल्या जातात. त्याचा उत्तम फायदा घेत तुम्ही या व्यवसायाला गती देऊ शकता. महत्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय उभा करण्यासाठी किमान ९०० वर्गफूट जागा असणे गरजेचे आहे. तसेच खाद्यपदार्थ असल्याने फार काळजी घेणेही गरजचे आहे. काम अगदी सावधतेने करावे.
लोणच्याचा हा व्यवसाय सुरु करण्यासाठी परवाना आवश्यक असणार आहे. फूड सेफ्टी एंड स्टॅन्डर्ड आथोरिटी (FSSAI)वरून परवाना काढता येईल. त्यासाठी इच्छुकांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि ३० दिवसांचा आत परवाना उपल्बध केला जाईल. व्यवसाय नफा देण्यास सुरुवात करताच कैरीसह लिंबाचे लोणचे, मिरचीचे लोणचे अशा प्रकारांनाही सुरुवात करू शकता.