Sonata नवे स्लिक कलेक्शन, स्टाइल अशी की दिसताच क्षणी पडेल भुरळ
भारतात अनेक उत्तम वॉच ब्रॅण्ड्स आहेत, जे आपल्या उत्तम आणि बेस्ट वॉचेस मार्केटमध्ये आणत असतात. आता सोनाटाने आपले नवीन वॉचेस सादर केले आहे.
भारतातील आघाडीचा वॉच ब्रँड, सोनाटाने आपल्या स्लीक सीरिजची सहावी आवृत्ती सादर केली आहे, द स्लीक कलेक्शन. शान आणि नावीन्य यांचे नवनवे अर्थ शोधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची सोनाटाची वचनबद्धता या लाँचमधून दिसून येते, सोनाटाच्या आजवरच्या इतिहासातील हे सर्वात स्लिम मेन्स वॉच आहे. ठळकदार नवी ओळख आणि अतिशय बारकाईने तयार करण्यात आलेली लाईनअप यांच्यासह या कलेक्शनमध्ये मिनिमलिस्ट सोफिस्टिकेशन आहे. आधुनिक युवा प्रोफेशनल्सच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार हे घड्याळ तयार करण्यात आले आहे. शहरी आणि उपनगरी ट्रेंडसेटर्सना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आलेली ही घड्याळे त्यांच्या प्रोफेशनल महत्त्वाकांक्षा दर्शवते, स्लीक कलेक्शनमध्ये कालातीत डिझाईन आणि आधुनिक संवेदना यांचा मिलाप घडवण्यात आला आहे.
उद्योगक्षेत्राच्या अहवालानुसार, भारतीय मध्यम किंमतीच्या, स्टाईल आणि मूल्य दोन्ही देणाऱ्या घड्याळांना प्राधान्य देतात. सोनाटाचे नवीन स्लीक कलेक्शन ही मागणी पूर्ण करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, यामध्ये सौंदर्य आणि परवडण्याजोगी किंमत या दोन्हींचा मिलाप आहे. अल्ट्रा-स्लिम ६.०५ एमएम प्रोफाइल, डिश कन्स्ट्रक्टेड बॉटम यामुळे ही घड्याळे मनगटावर अगदी फिट बसतात. यामध्ये पट्ट्याचे मेटल, लेदर आणि मेश असे वेगवेगळे पर्याय आहेत. प्रोफेशनल आणि सोशल या दोन्हींमध्ये आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी उत्सुक युवा मिलेनियल्स आणि जेन झी यांच्या व्यस्त जीवनशैलीला अनुरूप असे हे कलेक्शन आहे. सौंदर्य आणि व्यवहार्यता यांच्यात उत्तम संतुलन साधणारे हे कलेक्शन नवीन युगातील प्रोफेशनल्सच्या महत्त्वाकांक्षांना अनुरूप घड्याळे प्रस्तुत करण्याची, सोनाटाला ट्रेंड-सॅव्ही व्यक्तींचा आवडता ब्रँड बनवण्याची वचनबद्धता दर्शवते.
सोनाटाचे हेड ऑफ ब्रँड गुप्ता यांनी नवीन कलेक्शनबद्दल सांगितले, “नवे स्लीक कलेक्शन प्रस्तुत करून आम्ही सोनाटाच्या नावीन्य आणि उत्कृष्टतेच्या प्रवासात अजून एक मोठे पाऊल उचलत आहोत. आजच्या काळातील प्रोफेशनल्सच्या नवनवीन आवडीनिवडींना अनुसरून हे कलेक्शन डिझाईन करण्यात आले आहे, स्टाईल आणि व्यवहार्यता यांचे उत्तम संतुलन यामध्ये आहे. सोनाटामध्ये आम्ही अशी घड्याळे तयार करण्यावर भर देतो जी व्यक्तिगत स्टाईल वाढवतात, आमच्या ग्राहकांच्या वेगवान जीवनशैलीला अगदी साजेशी आहेत.”
Online मागवायचे आहे किराणा सामान, ‘हे’ क्रेडिट कार्ड करेल 10 टक्के बचत
अतिशय व्यस्त आणि गतिशील वातावरणात पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या या सीरिजमध्ये तुम्हाला सुंदर आणि फंक्शनल अशा दोन्ही प्रकारची घड्याळे मिळतात. १८९५ ते २८९५ रुपयांदरम्यान किमती असलेले स्लीक कलेक्शन www.sonatawatches.in वर आणि भारतभरातील रिटेल आउटलेट्समध्ये खरेदी करता येईल.