Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: घसरणीसह उघडणार सेन्सेक्स-निफ्टी? तज्ज्ञांनी दिला ‘या’ शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

Share Market Update: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर दिसत आहे. गिफ्ट निफ्टीकडून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2026 | 08:56 AM
Share Market Today: घसरणीसह उघडणार सेन्सेक्स-निफ्टी? तज्ज्ञांनी दिला ‘या’ शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

Share Market Today: घसरणीसह उघडणार सेन्सेक्स-निफ्टी? तज्ज्ञांनी दिला ‘या’ शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी 179 पॉइंट्सनी घसरल्याने बाजारासाठी नकारात्मक संकेत मिळाले आहेत.
  • तज्ज्ञांनी कॅनरा बँक, टाटा कंझ्युमर आणि स्विगीसह अनेक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
  • अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढून बाजारावर दबाव निर्माण झाला आहे.
India Share Market Update: अमेरिका आणि इराणने शांततेचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज ११ मे रोजी, सोमवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १७९ पॉइंट्सच्या सवलतीवर, २४,०५५ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किरकोळ घसरण, चांदीच्या किंमतीतही झाला बदल! किती आहे 22 कॅरेटचा भाव?

शुक्रवारी, भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली आणि निफ्टी ५० २४,२०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ५१६.३३ अंकांनी, म्हणजेच ०.६६ टक्क्यांनी घसरून ७७,३२८.१९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५०.५० अंकांनी, म्हणजेच ०.६२ टक्क्यांनी घसरून २४,१७६.१५ वर स्थिरावला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ७३६.८५ अंकांनी, म्हणजेच १.३१% ने घसरून ५५,३१०.५५ वर बंद झाला. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात काय परिस्थिती असणार, याबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कॅनरा बँक, इंडियन हॉटेल्स, जेएसडब्ल्यू एनर्जी, स्विगी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज, अर्बन कंपनी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, ह्युंदाई मोटर, बँक ऑफ बडोदा, बजाज हेल्थकेअर या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज सोमवारी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. व्यंकटरमण यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड, टिमकेन इंडिया लिमिटेड, ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड आणि ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड यांचा समावेश आहे.

साडी तर नेहमीच देता, यंदा आईसाठी SIP सुरू करा! निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी द्या गुंतवणुकीचं अनोख गिफ्ट

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन शेअर्सची निवड केली आहे. यानुसार आज गुंतवणूकदार मोरपेन लॅबोरेटरीज, रिलायन्स आणि एयू स्मॉल फायनान्स बँक या शेअर्सवर देखील लक्ष ठेऊ शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना एशियन पेंट्स, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, व्हीएसटी इंडस्ट्रीज आणि रॅडिको खैतान हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today experts suggest key stocks amid weak market signals share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला
1

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर
3

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर

Share Market Crash : गुंतवणूकदारांना फुटला घाम… सलग 7 आठवड्यांपासून घसरण सुरुच; मार्केटमध्ये नक्की घडतंय काय?
4

Share Market Crash : गुंतवणूकदारांना फुटला घाम… सलग 7 आठवड्यांपासून घसरण सुरुच; मार्केटमध्ये नक्की घडतंय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.