Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळवंटात फुलवली सफरचंदाची शेती; ‘ही’ महिला शेतकरी करतीये वर्षाला 40 लाखांची कमाई!

शेती हा आजकाल अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे पाहायला मिळत आहे. यात काही महिला शेतकरी देखील मागे नसल्याचे दिसून येत आहे. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतले असून, त्या शेतीमधून लाखोंची कमाई करत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 06, 2024 | 05:29 PM
वाळवंटात फुलवली सफरचंदाची शेती; 'ही' महिला शेतकरी करतीये वर्षाला 40 लाखांची कमाई!

वाळवंटात फुलवली सफरचंदाची शेती; 'ही' महिला शेतकरी करतीये वर्षाला 40 लाखांची कमाई!

Follow Us
Close
Follow Us:

शेती हा आजकाल अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जण आपली नोकरी सोडून शेतीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर त्यांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. यात काही महिला शेतकरी देखील मागे नसल्याचे दिसून येत आहे. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतले असून, त्या शेतीमधून लाखोंची कमाई करत आहे.

वाळवंटात सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी

संतोष देवी असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी आहेत. सफरचंदाची शेती म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर नाव उभे राहते ते जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश या राज्यांचे… मात्र, संतोष देवी यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राजस्थानसारख्या वाळवंटी भागात देखील सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – केक विकून कोट्यवधी रुपयांची कमाई करते ‘या’ क्रिकेटरची पत्नी; वार्षिक कमाई ऐकून चाट पडाल…

शेतीसोबत करतात रोपवाटिका व्यवसाय

संतोष देवी राजस्थानातील आपल्या सीकर या जिल्ह्यात सफरचंदाची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेतात सफरचंदाची एकूण १०० झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे त्या सेंद्रिय शेती करतात. प्रत्येक झाडापासून त्यांना दरवर्षी 80 किलो सफरचंद मिळतात. संतोष देवी शेतीसोबतच रोपवाटिका व्यवसायही करतात. संतोष देवी फळांची शेती आणि रोपवाटिका यातून वर्षाला सुमारे ४० लाख रुपयांची कमाई करत असल्याचे त्या सांगतात.

इतर फळांचीही करतात लागवड

संतोष देवी यांच्याकडे एकूण 220 डाळिंबाची झाडे आहेत. प्रत्येक झाडापासून त्यांना वर्षाला सुमारे 60 किलो डाळिंब मिळतात. याशिवाय त्या सेंद्रिय पद्धतीने किन्नू, लिंबू आणि सपोटा हे देखील फळपीके घेतात. डाळींबाला 200 रुपये प्रति किलोचा दर मिळतो. वनस्पती रोपवाटिकांमधूनही ती चांगली कमाई करते. यामध्ये केशर, आंबा, सपोटा, सफरचंद, पेरू, डाळिंब आणि लिंबू या झाडांच्या रोपांचा समावेश आहे. नर्सरीतून त्यांना वर्षाला अंदाजे २५ लाख रुपये कमाई मिळते. याशिवाय त्यांना अन्य फळपिकांमधून देखील मोठी कमाई मिळते.

किती होते वार्षिक कमाई?

संतोष देवी या आपल्या शेतात पिकणाऱ्या सफरचंदाला 150 ते 200 रुपये प्रति किलो दराने विक्री करतात. विशेष म्हणजे खरेदीदार सेंद्रिय सफरचंदाची खरेदी करण्यासाठी त्यांच्या शेखावटी कृषी फार्म आणि रोपवाटिकेला भेट देतात. या सफरचंदांची चव इतर प्रकारच्या सफरचंदांपेक्षा गोड असल्याचे ती सांगते. फळ विक्री आणि रोपवाटिका यातून त्या वर्षाला सुमारे ४० लाख रुपयांची कमाई करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

Web Title: Success story an apple farm flourished in the desert women farmer earn 40 lakhs a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 05:29 PM

Topics:  

  • Agriculture News

संबंधित बातम्या

Ch. Sambhajinagar : मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण; शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा
1

Ch. Sambhajinagar : मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण; शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.