Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार वर्षात कोट्यवधींचा टर्नओव्हर! अगदी २६ वर्षात उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य

दिल्लीतील 26 वर्षीय प्रीतिका सिंह यांनी नोकरी सोडून ‘मोह’ फर्निचर ब्रँड सुरू केला आणि चार वर्षांत तो कोट्यवधींच्या टर्नओव्हरवर पोहोचला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 06, 2025 | 03:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीतील युवा उद्योजिका प्रीतिका सिंह यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आहे. केवळ 26 व्या वर्षी त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मार्च 2020 मध्ये त्यांनी ‘मोह’ नावाचा फर्निचर ब्रँड उभारला आणि केवळ चार वर्षांत तो कोट्यवधींचा टर्नओव्हर करणारा यशस्वी ब्रँड ठरला.

₹57,000 कोटीच्या कर्जात बुडालेली कंपनी खरेदीसाठी भिडले Adani आणि Vedanta, कोणी मारली बाजी?

प्रीतिका यांचा जन्म व्यावसायिक कुटुंबात झाला असून सुरुवातीपासूनच त्यांची व्यवसायाकडे ओढ होती. त्यांनी 2012 मध्ये मॉडर्न स्कूल, बाराखंभा रोड येथून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातील भगतसिंह कॉलेजमधून बी.कॉम. केले. 2016 मध्ये त्यांनी अर्न्स्ट अँड यंग या नामांकित कंपनीत फक्त 22 हजार रुपये पगारावर नोकरीची सुरुवात केली. पुढे त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी एका आंतरराष्ट्रीय हेल्थकेअर कंपनीत काम केले आणि जानेवारी 2020 पर्यंत पन्नास हजार रुपयांवर पोहोचल्या. तथापि, नोकरीत समाधान मिळत नसल्याने आणि व्यवसाय सुरू करण्याची जिद्द असल्याने त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली नवीन योजना आखली. वडिलांच्या कंपनीतील संसाधनांचा वापर करून फर्निचर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्च 2020 मध्ये ‘मोह’ या ब्रँडची स्थापना झाली. सुरुवातीला फक्त पाच कर्मचारी आणि वडिलांच्या कारपेंटरांच्या मदतीने त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.

याच काळात देशात लॉकडाऊन जाहीर झाले होते. अनेक व्यवसाय बंद पडले, पण प्रीतिकाने यात संधी पाहिली. घरातून काम करण्याचा ट्रेंड वाढल्यामुळे टेबल, खुर्च्यांची मागणी वाढेल, हे तिने ओळखले. त्वरित ‘वर्क फ्रॉम होम सिरीज’ अंतर्गत नवीन डिझाइन्स बाजारात आणले. उत्पादनांच्या छायाचित्रांसाठी अडचण आल्याने CGI (कंप्युटर-जनरेटेड इमेजरी) चा वापर करून 3D मॉडेल तयार केले. मे 2020 मध्ये वेबसाइट सुरू झाली आणि जून महिन्यात त्यांना पहिला ऑर्डर मिळाला. हा त्यांच्या प्रवासातील मोठा टप्पा ठरला.

अदानी समूहाची अभूतपूर्व झेप; भूतानमध्ये 570 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी ‘Druk Green Power’सोबत ऐतिहासिक करार

पहिल्या महिन्यातील विक्री फक्त 3.5 लाख रुपयांची असली तरी व्यवसाय झपाट्याने वाढत गेला. चार वर्षांत ‘मोह’ने 8 हजारांहून अधिक फर्निचर पीसेस विकले असून टर्नओव्हर 3.7 कोटी रुपयांवर पोहोचला. आज ‘मोह’कडे 900 पेक्षा जास्त उत्पादनांची रेंज आहे. ग्राहकांना कस्टमाइजेशनची सोय असून मोठ्या कंपन्या आणि शाळांसाठीही फर्निचर प्रकल्प ते हाताळतात. प्रीतिका सिंह यांनी दाखवून दिले की आव्हानांना घाबरून न जाता योग्य वेळ साधून त्यांचा फायदा करून घेतल्यास यश नक्की मिळते. त्यांची कहाणी प्रत्येक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी ठरते.

Web Title: Success story of preetika singh business moh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

Karma Global News: Karma Global ची वेबिनार सिरीज यशस्वी; 2500 हून अधिक सहभागींनी घेतला सहभाग 
1

Karma Global News: Karma Global ची वेबिनार सिरीज यशस्वी; 2500 हून अधिक सहभागींनी घेतला सहभाग 

EPFO News: नोकरी बदलल्यावर PF ट्रान्सफरची कटकट संपणार! लागू होत आहे ‘हा’ मोठा बदल!
2

EPFO News: नोकरी बदलल्यावर PF ट्रान्सफरची कटकट संपणार! लागू होत आहे ‘हा’ मोठा बदल!

Salary PF: नव्या लेबर कोडनुसार जास्त PF कपात होणार कमी होणार वेतन? सरकारने भीती मिटवली; चिंता केली दूर
3

Salary PF: नव्या लेबर कोडनुसार जास्त PF कपात होणार कमी होणार वेतन? सरकारने भीती मिटवली; चिंता केली दूर

Ghost Malls in India: देशातील प्रत्येक पाचवा मॉल बनतोय ‘Ghost Malls’;नाईट फ्रँकचा धक्कादायक अहवाल
4

Ghost Malls in India: देशातील प्रत्येक पाचवा मॉल बनतोय ‘Ghost Malls’;नाईट फ्रँकचा धक्कादायक अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.