येत्या 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार; टाटा समुहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची घोषणा
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील पाच वर्षात पाच लाख रोजगारांची निर्मिती करण्याचा विचार असल्याचे टाटा समुहाकडून सांगण्यात आले आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी नववर्षानिमित्त टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, 2024 हे वर्ष अनपेक्षित असे राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, आगामी पाच वर्षात पाच लाख रोजगारांची निर्मिती करण्याबाबत कंपनीकडून विचार करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
काय म्हटलंय चंद्रशेखरन यांनी आपल्या पत्रात?
त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 2024 मध्ये जागतिक पातळीवर राजकीय अस्थिरतेचे राहिले आहे. यक्रेन, गाझा पट्टी, सुदानमध्ये लष्करी संघर्ष दिसून आला आहे. पश्चिम आशिया, आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि बांगलादेशमधील जनआंदोलनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा उल्लेख देखील चंद्रशेखरन यांनी त्यांच्या पत्रात केला आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पत्रात टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांना आंदरांजली वाहिली आहे. ते म्हणाले आहे की, रतन टाटा यांचे निधन आपल्या सर्वांसाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी मोठी हानी होती. ते दूरदर्शी व्यक्तिमहत्व होते. त्यांनी एका पिढीच्या व्यवसायाला आकार दिला, असेही चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. रतन टाटा यांचे निधन 9 ऑक्टोबरला वयाच्या 86 व्या वर्षी झाले.
तुम्हांला बॅंका कर्ज देणार की नाही? ‘या’ एका स्कोरवरून ठरते; वाचा… कसा सुधारेल तो?
कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होणार
एन. चंद्रशेखरन यांनी पुढील पाच वर्षात पाच लाख नोकऱ्यांची निर्मिती करण्याच्या टाटा ग्रुपच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. बॅटरी, सेमी कंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील उपकरणे यामध्ये नोकऱ्या कारखाने निर्मिती आणि योजनांमधील गुंतवणुकीतून निर्माण होणार आहेत. या पाच लाख नोकऱ्या सेवा क्षेत्रा व्यतिरिक्त असणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
टाटा ग्रुप गुजरातच्या ढोलेरामध्ये एक सेमिकंडक्टर प्रकल्प आणि आसाममध्ये सेमींकडक्टर ओएसटी संयत्र निर्मितीचा प्रकल्प उभारणार असल्याचे एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. टाटा ग्रुपच्या रिटेल क्षेत्रातील कंपन्यांचा विस्तार सुरु आहे. एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 2025 या वर्षाबाबत आशावादी असल्याचे देखील एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार
टाटा ग्रुपच्या टाटा कॅपिटल या कंपनीचा आयपीओ 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. टाटा कॅपिटलचा आयपीओ 17 हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे. यापूर्वी टाटा टेक्नोलॉजीचा आयपीओ आला होता. या दशकात टाटा ग्रुपच्या कंपनीचा दुसरा आयपीओ येऊ शकतो. टाटा ग्रुपचा आणखी एक आयपीओ येणार हे कळताच टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली आहे.