Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tax Audit Due Date Extension 2025: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवली, वाचा साविस्तर

टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढली आहे. सीबीडीटीने ३० सप्टेंबरवरून ही मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे लाखो करदात्यांना आणि ऑडिटर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 25, 2025 | 06:07 PM
करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! (Photo Credit- X)

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी!
  • टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदती वाढ
  • CBDT च्या निवेदनात काय म्हटले?

Tax Audit Due Date Extension 2025: केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयकर रिटर्नच्या बाबतीत ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून ३१ ऑक्टोबर २०२५ केली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ होती. या संदर्भात सीबीडीटीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर माहिती दिली आहे.

ऑडिटर्सची मागणी मान्य

यापूर्वी सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ (असेसमेंट ईयर २०२५-२६) साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली होती. त्यामुळे ऑडिटर्सना ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी मिळाला होता. इतक्या कमी वेळेत मोठ्या संख्येने ऑडिट रिपोर्ट जमा करणे शक्य नसल्याने ऑडिटर्स मुदतवाढीची मागणी करत होते.

The Central Board of Direct Taxes (CBDT) has decided to extend the specified date for filing various audit reports for the Previous Year 2024–25 (Assessment Year 2025–26), from 30th September 2025 to 31st October 2025, for assessees referred to in clause (a) of Explanation 2 to… pic.twitter.com/rGs7Vagw03 — Income Tax India (@IncomeTaxIndia) September 25, 2025


दरवर्षी देशभरात सुमारे ४० लाख ऑडिट रिपोर्ट दाखल होतात, मात्र या वर्षी २३ सप्टेंबरपर्यंत केवळ ४ लाखच रिपोर्ट दाखल होऊ शकले होते. अशा परिस्थितीत उर्वरित ३६ लाख रिपोर्ट पुढील काही दिवसांत दाखल करणे जवळपास अशक्य होते.

CBDT च्या निवेदनात काय म्हटले?

सीबीडीटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला चार्टर्ड अकाउंटंट संघटनांसह अनेक व्यावसायिक संघटनांकडून निवेदन मिळाले होते. यात करदात्यांना आणि व्यावसायिकांना वेळेत ऑडिट रिपोर्ट पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणींचा उल्लेख होता. या निवेदनात देशाच्या काही भागांमध्ये पूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळे व्यवसायांना व व्यावसायिक कामांना आलेला व्यत्यय नमूद करण्यात आला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयांसमोरही मांडण्यात आले होते.”

Tax घोटाळे ओळखा, तुमच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करा; कुठे कराल तक्रार इत्यंभूत माहिती

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या निवेदनांचा आणि न्यायालयासमोर केलेल्या अपीलांचा विचार करून आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३९ मधील उप-कलम (१) च्या स्पष्टीकरण २ च्या (अ) मध्ये नमूद केलेल्या करदात्यांसाठी मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ (असेसमेंट ईयर २०२५-२६) साठी ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची तारीख ३० सप्टेंबर, २०२५ वरून वाढवून ३१ ऑक्टोबर, २०२५ करण्यात आली आहे.” या संदर्भात एक औपचारिक आदेश किंवा अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.

उच्च न्यायालयांनीही दिले होते निर्देश

यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर पीठाने एका अंतरिम आदेशात सीबीडीटीला टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले होते. तसेच, कर्नाटक उच्च न्यायालयानेही आयकर कायदा, १९६१ च्या कलम ४४एबी अंतर्गत टॅक्स ऑडिट रिपोर्ट (TAR) दाखल करण्याची अंतिम तारीख एक महिन्याने वाढवून ३१ ऑक्टोबर २०२५ केली होती.

पोर्टल अखंडपणे सुरू होते

सीबीडीटीने आपल्या निवेदनात हेही स्पष्ट केले की, आयकर ई-फायलिंग पोर्टल कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय अखंडपणे सुरू आहे. टॅक्स ऑडिट रिपोर्ट यशस्वीरित्या अपलोड होत आहेत. २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत ७.५७ कोटींहून अधिक आयटीआर (ITR) दाखल झाले होते. त्याचप्रमाणे, २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत ४,०२,००० टॅक्स ऑडिट रिपोर्ट अपलोड झाले होते, ज्यात २४ सप्टेंबर रोजी एकट्या ६०,००० हून अधिक ऑडिट रिपोर्ट अपलोड करण्यात आले.

Web Title: Tax audit report deadline extension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • income tax
  • Income Tax Return

संबंधित बातम्या

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार
1

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार

PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, 3 नोव्हेंबरपासून बदलतील ‘हे’ नियम
2

PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, 3 नोव्हेंबरपासून बदलतील ‘हे’ नियम

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी
3

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी

Share Market Closing: सलग पाचव्या दिवशी बाजार कोसळला, IT शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
4

Share Market Closing: सलग पाचव्या दिवशी बाजार कोसळला, IT शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.