Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PF चे पैसे थेट ATM मधून काढता येणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

केंद्र सरकार प्रोव्हिडंट फंड सिस्टममध्ये एक मोठा बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्यामुळे पीएफ खातेधारक हे थेट डेबिट कार्डच्या द्वारे पीएफचे पैसे काढू शकणार आहेत. जाणून घेऊया याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Nov 29, 2024 | 03:59 PM
PF चे पैसे थेट ATM मधून काढता येणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारकडून देशातील PF खातेदारकांना आनंदाची बातमी दिली जाणार आहे. केंद्र सरकार प्रोव्हिडंट फंड सिस्टममध्ये एक मोठा बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्यामुळे पीएफ खातेधारक हे थेट डेबिट कार्डच्या द्वारे पीएफचे पैसे काढू शकणार आहेत. केंद्र सरकारकडून ही अत्यंत महत्वाची सुविधा दिली जात आहे. या पैसे काढण्यावर मर्यादा असणार आहे. त्यामुळे आपात्कालीन पैसे काढण्याबरोबरच भविष्यासाठी बचत ही होऊ शकणार आहे. सरकारकडून आणल्या जाणाऱ्या EPFO 3.0 च्या योजनेचा हा एक भाग आहे.

Today’s Gold Price: रशिया-युक्रेन युद्धातील वाढता तणाव, इस्रायल-हिजबुल्लाह युद्धविराम आरोपांमुळे MCX सोन्याचे दर वाढले

पीएफ योगदानाच्या मर्यादेत वाढ

मीडिया रिपोर्टस नुसार, सरकारकडून पीएफमध्ये कर्मचारी योगदानाकरिता 12 टक्क्यांची मर्यादा आहे. या मर्यादेला सरकार बदलणार असून कर्मचारी हे स्वत: बचतीची रक्कम ठरवू शकतात असा पर्याय उपलब्ध केला जाऊ शकतात. त्यामुळे कर्मचारी अथवा कामगार वर्ग याद्वारे एक चांगली रक्कमेची बचत करु शकतात. हे पीएफ योगदान कर्मचाऱ्याचा पगारानुसार ठरविण्यात येणार आहे. आता बेसिक पेच्या 12 टक्केच रक्कम पीएफमध्ये जमा करता येते. मात्र येणाऱ्या ईपीएफओ 3.0 मध्ये अधिक योगदान कर्मचारी करु शकणार आहे.

EPFO 3.O

EPFO 3.0 द्वारे सरकार कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देण्याच्या तयारीत आहे. तसेच कर्मचारी जी बचत करतात त्यावर त्यांचे नियंत्रण देण्याचा या द्वारे प्रयत्न आहे. ईपीएफओ 3.O एटीएममधून पीएफचे पैसे काढले जातील. सरकारच्या या उपक्रमाचा फायदा करोडो कर्मचाऱ्यांना होणार आहे. EPFO 3.O मध्ये कर्मचाऱ्यांना थेट ATM द्वारे PF चे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. त्याच वेळी, पीएफ खातेधारकांना मर्यादित स्वरुपातील पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागेल. सध्या कर्मचारी केवळ विशिष्ट परिस्थितीमध्येच पीएफचे पैसे काढू शकतात. कर्मचारी EPFO ​​वेबसाइट (https://www.epfindia.gov.in) अथवा उमंग ॲपद्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. ईपीएफमध्ये मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेमध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून बऱ्याच कालावधीपासून होत होती. आता EPFO ​​3.0 मध्ये पेन्शनची रक्कम वाढविण्यावर काम करणे अपेक्षित आहे.

भारताची गिग अर्थव्‍यवस्‍था ९ कोटी रोजगार निर्माण करू शकते- फोरम फॉर प्रोग्रेसिव्‍ह गिग वर्कर्स

पेन्शनच्या रक्कमेत होणार वाढ 

पीएफ  खात्यात अधिक योगदान दिल्यास खातेधारकांच्या  पेन्शनवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे ईपीएसमध्ये जास्त योगदान देण्याच्या पर्यायावर कामगार मंत्रालयाकडूनही विचार केला जात आहे. बदलानुसार, कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढवण्यासाठी EPS-95 मध्ये अधिक योगदान देण्याची परवानगी दिली जाऊ शकते. सामाजिक लाभांमध्ये सुधारणा करण्यासोबतच केंद्रातील मोदी सरकार रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावरही भर देत आहे.

केंद्र सरकार या दृष्टीने  पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत मात्र लवकरच यासंबंधीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी कर्मचाऱ्यांकडून ईपीएफओ 3.० मध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळण्याची अपेक्षा  आहे.

 

Web Title: The decision to be taken by the central government will allow pf money to be withdrawn directly from atm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 03:59 PM

Topics:  

  • EPFO
  • EPFO Pension

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.