आजचा सोन्याचा भाव नक्की किती (फोटो सौजन्य - iStock)
रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हिजबुल्लाह युद्धावरून वाढत्या भू-राजकीय तणावानंतर शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात जोरदार खरेदी झाली. MCX वर आज (डिसेंबर 2024 फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट) सोन्याची किंमत रू 76,334 प्रति 10 ग्रॅम वर उघडली गेली आणि सुरुवातीची घंटा जेव्हा वाजली तेव्हा त्यानंतर काही मिनिटांतच रू. 76,504 च्या इंट्राडे उच्चांकावर किंमत पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात, COMEX सोन्याचा भाव 0.75 टक्क्यांहून अधिक वाढून $2,682 प्रति ट्रॉय औंस झाला, तर स्पॉट सोन्याचा भाव सुमारे $2,659 प्रति औंस राहिला आहे (फोटो सौजन्य – iStock)
काय आहे मार्केटचे मत
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराण समर्थित दहशतवादी गट हिजबुल्लाह यांच्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या आरोपांमुळे आज सोन्याचे भाव वाढत आहेत. दरम्यान, रशियानेही युक्रेनवर काही नवीन क्षेपणास्त्र हल्ले करून आपली स्थिती मजबूत केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण झाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून ते सोन्याकडे आकर्षित होत आहेत.
Todays Gold Price: मुंबईसह देशभरातील या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ, वाचा आजचे दर
काय सांगतात तज्ज्ञ
आज सोन्याच्या किमती वाढण्यामागील कारणांवर भाष्य करताना, जतीन त्रिवेदी, उपाध्यक्ष संशोधन विश्लेषक – कमोडिटी अँड करन्सी, LKP सिक्युरिटीज, म्हणाले, “सोन्याच्या किमतींमध्ये बरीच अस्थिरता दिसून आली, कारण याची सुरुवात कमकुवत होती, परंतु युक्रेन आणि युक्रेनमधील नूतनीकृत भू-राजकीय तणावादरम्यान रशियाला त्वरीत पाठिंबा मिळाला. तसंच $2,625 किमतीला तात्काळ समर्थन असून $2,655 या किमतीला विरोध दिसून आला. $2,620 च्या खाली एक निर्णायक घसरण $2,580 च्या दिशेने जाऊ शकते, तर $2,665 पेक्षा जास्त वाढ नजीकच्या काळात किमती $2,690 कडे ढकलू शकते आणि गती अनिश्चित राहील” असेही त्यांनी सांगितले. सोन्याच्या किमतीत नेहमीच चढउतार दिसून येतात. पण सध्या युद्धामुळे सोन्याच्या किमतीत अधिक बदल दिसत असल्याचेही आता तज्ज्ञांचे म्हणणे समोर येत आहे.
तणावावर भाष्य
भू-राजकीय तणावावर बोलताना, एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि चलन प्रमुख अनुज गुप्ता म्हणाले, “रशिया-युक्रेन युद्धानंतर भू-राजकीय तणाव वाढत आहे आणि इस्रायल आणि हिजबुल्लाह यांनी एकमेकांवर युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण होत आहेत आणि या कारणाने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आकर्षित होत आहेत.”
नजीकच्या काळातील सोन्याचा भाव
नजीकच्या काळात सोन्याच्या किमतीबद्दल बोलताना, एचडीएफसी सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले, “एकंदरीत, आज सोन्याचे भाव सकारात्मकतेने बांधलेले आहेत, त्यामुळे आजच्या घडीला सोन्याच्या किमती ₹ 75,500 ते ₹ 77,000 प्रति 10 ग्रॅमच्या दरम्यान आहेत, तर स्पॉट सोन्याच्या किमती आज डॉलर 2,630 ते डॉलर 2,80 प्रति औंस आहेत” दरम्यान “अस्तित्वातील प्रतिकार मोडून काढल्यास, MCX सोन्याची किंमत 77,700 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते, तर स्पॉट सोन्याची किंमत प्रति ट्रॉय औंस $2,700 पर्यंत पोहोचू शकते,” असेही अनुज गुप्ता म्हणाले.
Todays Gold Price: सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचे दर