Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहनिर्माण क्षेत्रासाठी सणासुदीचा काळ ठरतोय वरदान! चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीत 30 % वाढ

२०२५ ची पहिली सहामाही तुलनेने स्थिर राहिली असली, तरी सणासुदीच्या हंगामात बाजारपेठेत नव्या उत्साहाची लाट आहे. विकासक एकापाठोपाठ महत्त्वाचे प्रकल्प लॉन्च करत असून आकर्षक ऑफर्स सादर करत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2025 | 05:11 PM
गृहनिर्माण क्षेत्रासाठी सणासुदीचा काळ ठरतोय वरदान (फोटो सौजन्य-X)

गृहनिर्माण क्षेत्रासाठी सणासुदीचा काळ ठरतोय वरदान (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

मुंबई : गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंतचा सणासुदीचा काळात भारतातील गृहनिर्माण बाजारातील मागणीस नेहमीच चालना देतो आणि वार्षिक विक्रीत जवळपास एकतृतीयांश वाटा उचलतो. २०२५ ची पहिली सहामाही तुलनेने स्थिर राहिली असली, तरी सणासुदीच्या हंगामात बाजारपेठेत नव्या उत्साहाची लाट आहे. विकासक एकापाठोपाठ महत्त्वाचे प्रकल्प लॉन्च करत असून आकर्षक ऑफर्स सादर करत आहेत, तर खरेदीदारही आपल्या निर्णयाला पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत.

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये

मध्यम व प्रीमियम सेगमेंटमधील सातत्यपूर्ण मागणी, ग्राहकांच्या आत्मविश्वासात झालेली लक्षणीय वाढ आणि जीवनशैलीवर आधारित निवास प्रकल्पांकडे वाढलेले आकर्षण अशा सकारात्मक घटकांचा संगम हे सणासुदीचा मोसम वरदान ठरण्याचे प्रमुख कारण आहे. २०२५ च्या चौथ्या तिमाहीत केवळ मोसमी पुनरुज्जीवन होणार नाही, तर या काळात निर्माण झालेली गती २०२६ पर्यंत गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीस चालना देईल, असा विश्वास आरईए इंडियाचे (हाऊसिंग डॉटकॉम) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा यांनी व्यक्त केला.

भारतातील गृहनिर्माण बाजाराने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत तुलनेने मंदी अनुभवली. सलग दोन वर्षांच्या दमदार वृद्धीनंतरचा हा दुरुस्तीचा टप्पा होता. मात्र, ऐतिहासिक प्रवाह दर्शवितो की सप्टेंबर ते डिसेंबरमधील सणासुदीची तिमाही मागणीत नेहमीच सुधारणा घडवते आणि यंदाही तोच कल कायम राहील, अशी अपेक्षा आहे.

हाऊसिंग डॉटकॉम आउटलुकनुसार गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी घरांच्या विक्रीसाठी सर्वाधिक मजबूत ठरला आहे. या काळात विकासक नवीन प्रकल्प लॉन्च करून आकर्षक ऑफर्स आणि मार्केटिंग मोहिमा राबवतात, तर खरेदीदार मोठ्या खरेदीची योजना आखतात. त्यामुळेच चौथी तिमाही वार्षिक कामगिरीच्या दृष्टीने निर्णायक मानली जाते.

गेल्या पाच वर्षांत (२०२०-२४) चौथ्या तिमाहीतील विक्रीने वार्षिक एकूण विक्रीत २५ ते ३० टक्के वाटा उचलला असून, ती प्रत्येक वर्षातील सर्वात दमदार तिमाही ठरली आहे. अगदी आव्हानात्मक काळातही (२०२० – कोव्हिडनंतरचा कालावधी) चौथ्या तिमाहीत तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३२ % वाढ नोंदली गेली असून, हीच सणासुदीच्या मोसमाची खरी ताकद मानली जाते. बहुतांश वर्षांत सणासुदीच्या मोसमातून मिळालेल्या चालनेमुळे तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत १० ते १५ टक्के अधिक व्यवहार नोंदले जातात.

मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवरून, २०२५ च्या चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीचा वाटा वार्षिक विक्रीत किमान ३०% असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यामुळे ही तिमाही पुन्हा एकदा सर्वाधिक दमदार ठरणार आहे. २०२५ ची पहिली सहामाही संथ राहिली असली तरी चौथ्या तिमाहीत विकासक नवीन प्रकल्प लॉन्च आणि आकर्षक योजना सादर करून बाजारपेठेला नव्या गतीची अपेक्षित चालना देतील.

RIL AGM 2025: ‘AI मुळे आता टीव्ही बदलणार कॉम्प्युटरमध्ये…’ Akash Ambani ने केली JioPC ची घोषणा

Web Title: The festive season is proving to be a boon for the housing sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • india
  • Luxury housing
  • real estate

संबंधित बातम्या

Embassy-Tower : अबब…! ‘या’ दिग्गज स्टॉकब्रोकर्सने 700 कोटींना विकत घेतले मुंबईतील आलिशान टॉवर, ठरला देशातील सर्वात मोठा व्यवहार
1

Embassy-Tower : अबब…! ‘या’ दिग्गज स्टॉकब्रोकर्सने 700 कोटींना विकत घेतले मुंबईतील आलिशान टॉवर, ठरला देशातील सर्वात मोठा व्यवहार

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
2

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
3

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
4

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.