
Coru Pack Print India Expo 2026: 'कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो २०२६' भव्य प्रदर्शनाचे आयोजन, भारतीय पॅकेजिंग उद्योगाला उभारणी
Coru Pack Print India Expo 2026: इंडियन पेपर कोरुगेटेड & पॅकेजिंग मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ICPMA) आणि फ्युचरेक्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पोच्या दुसऱ्या आवृत्ती जाहीर आयोजन करण्यात येणार असून हे भव्य प्रदर्शन १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान, हॉल क्रमांक ६, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई येथे होणार आहे. कोरुगेटेड पॅकेजिंग मशिनरी क्षेत्रासाठी भारतातील एकमेव असे हे प्रदर्शन असून २०२४ मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या आवृत्तीच्या यशावर आधारित ही प्रदर्शनी आयोजित केली जात आहे. अत्याधुनिक मशिनरींचे लाईव्ह डेमो, नॉलेज सेशन्स, तसेच भारत-विदेशातील अव्वल ब्रँड्सशी नेटवर्किंग, हे सर्व घटक २०२६ च्या आवृत्तीचे मुख्य आकर्षण राहणार आहेत.
कोरूपॅक प्रिंट इंडिया हे भारतातील एकमेव असे व्यासपीठ आहे, जिथे उद्योगातील दिग्गज कंपन्या नवीन तंत्रज्ञान, नेक्स्ट जनरेशन मशिनरी, आणि सस्टेनेबल तसेच कॉस्ट-इफेक्टीव्ह सोल्यूशन्स सादर करणार आहेत. कोरुगेशन आणि पॅकेजिंग क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या गरजांना पूर्ण करण्यासाठी हा एक्स्पो उद्योगासाठी एक निर्णायक टप्पा ठरेल.
२०२६ मधील या एक्स्पोची प्रमुख वैशिष्ट्ये अत्यंत व्यापक आणि उद्योगाला दिशा देणारी आहेत. या प्रदर्शनात २५० हून अधिक मशिनरी आणि टेक्नॉलॉजी सप्लायर्स सहभागी होणार असून, नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचाही मोठा सहभाग अपेक्षित आहे. अंदाजे १५,००० पेक्षा अधिक ट्रेड व्हिजिटर्स या चार दिवसीय एक्स्पोला भेट देतील. संपूर्ण कोरुगेशन आणि पॅकेजिंग टेक्नॉलॉजींचे आधुनिक प्रदर्शन येथे पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये बॉक्स-मेकिंग मशिन्स, प्रिंटिंग आणि लॅमिनेशन सोल्यूशन्स, रिजिड बॉक्स व कार्टन उत्पादन मशिनरी, टेस्टिंग इक्विपमेंट, शाई/इंक, अॅडहेसिव्ह्ज, क्राफ्ट पेपर आणि इतर अनेक अत्याधुनिक उत्पादने आणि सोल्यूशन्सचा समावेश असेल.
भारतातील पॅकेजिंग इंडस्ट्रीचे मूल्य USD ७५ अब्ज (FY20) असून १८–२०% CAGR ने वाढत FY26 पर्यंत USD २५० अब्ज इतके होण्याचा अंदाज आहे. या प्रचंड वाढीत कोरुगेटेड आणि पेपर पॅकेजिंग सेक्टर चे योगदान मोठे आहे. आईसीपीएमएचे अध्यक्ष निकेत डी. शाह, आईसीपीएमए एक्झिबिशन कमिटीचे सदस्य, हितेश नागपाल, रौनकसिंह भुरजी, मनीष सुरेश शाह, तसेच फ्युचरेक्स ग्रुपचे डायरेक्टर नमित गुप्ता, मॅनेजिंग डायरेक्टर स्वामी प्रेम अन्वेषी जी, आणि डायरेक्टर निधी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली कोरूपॅक प्रिंट इंडिया हा भारतातील एकमेव डेडिकेटेड कोरुगेटेड पॅकेजिंग मशिनरी प्लॅटफॉर्म म्हणून उद्योगात एक मजबूत स्थान निर्माण करून आहे.
आईसीपीएमए अध्यक्ष निकेत डी. शाह म्हणाले, “पहिल्या आवृत्तीच्या प्रचंड यशामुळे उद्योगाला अशा फोकस्ड प्लॅटफॉर्मची किती गरज आहे हे सिद्ध झाले. कोरूपॅक प्रिंट इंडिया मध्ये आम्ही तीनपट मोठ्या स्केलवर, मशिनरी, रॉ मटेरियल आणि बॉयलर्स, हे सर्व एकाच छताखाली आणत आहोत. हा केवळ एक्स्पो नाही, तर भारतातील कोरुगेटेड पॅकेजिंग उद्योगासाठी एक ग्रोथ कॅटॅलिस्ट आहे.” फ्युचरेक्स ग्रुप चे डायरेक्टर नमित गुप्ता म्हणाले, “हा एक्स्पो म्हणजे इनोव्हेशन आणि बिझनेस व्हिजन यांचा उत्तम संगम आहे. येथे उद्योगातील लीडर्स एकत्र येऊन सहकार्याची, नवीन टेक्नॉलॉजीची आणि दीर्घकालीन बिझनेस वाढीची पायाभरणी करतील.”
हेही वाचा: 8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पासून पगारवाढ शक्य? लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला
२०२४ च्या दिल्लीतील उद्घाटन आवृत्तीने कोरूपॅक प्रिंट इंडियाला उद्योगासाठी एक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म म्हणून स्थापित केले. या एक्स्पोने सप्लायर्स, मॅन्युफॅक्चरर्स आणि निर्णय घेणारे स्टेकहोल्डर्स यांना एका मंचावर आणले आणि अनेक व्यवसायिक करार, भागीदारी आणि दीर्घकालीन संधी निर्माण केल्या. २०२६ आवृत्ती या गतीला अधिक बळ देत आहे. भारतभरातून व परदेशातून टॉप एक्झिक्युटिव्हज, प्लांट मॅनेजर्स, प्रोक्योरमेंट प्रमुख आणि टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट्स या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
२५० हून अधिक मशिन्सच्या लाईव्ह अॅक्शन फ्लोर मुळे हा संपूर्ण उद्योगासाठी अनुभवात्मक, नेटवर्किंग-केंद्रित आणि डील-मेकिंगसाठी उत्तम असणार आहे. फेडरेशन ऑफ कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स (FCBM) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे पाठबळ मिळालेल्या या कार्यक्रमामुळे उद्योगाला ज्ञान, नेटवर्किंग आणि भविष्यदृष्टी या तिन्हींचा मजबूत संगम मिळणार आहे.