Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जर १.२५ कोटी हिंदूंनी लढण्याचा निर्णय घेतला तर…”, RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान

"जर बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभी राहिली आणि लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंकडून सर्वतोपरी पाठबळ मिळेल," असे आश्वासन भागवत यांनी दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 08, 2026 | 05:40 PM
RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान (Photo Credit- X)

RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “जर १.२५ कोटी हिंदूंनी लढण्याचा निर्णय घेतला तर…”,
  • RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान
  • काय म्हणाले….
Mohan Bhagwat: बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी एक अत्यंत परखड आणि महत्त्वाचा संदेश दिला आहे. “जर बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभी राहिली आणि लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंकडून सर्वतोपरी पाठबळ मिळेल,” असे आश्वासन भागवत यांनी दिले.

‘१.२५ कोटी हिंदूंनी संघटित व्हावे’

मुंबईत आयोजित आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना मोहन भागवत म्हणाले, “बांगलादेशात आजच्या घडीला साधारण १.२५ कोटी हिंदू आहेत. ही संख्या कमी नाही. जर त्यांनी तिथेच राहून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार केला, तर त्यांना आम्ही इथून आपल्या सीमांच्या आत राहून आणि जगभरातील हिंदू आपापल्या स्थानांवरून शक्य ती सर्व मदत करतील – याची मी हमी देतो.”

त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, जर बांगलादेशातील हिंदू एकवटले, तर ते तिथल्या राजकीय व्यवस्थेचा वापर स्वतःच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी करू शकतात. मात्र, यासाठी त्यांचे संघटित असणे ही प्राथमिक अट आहे.

Mohan Bhagwat: नागपूरमध्ये महाभारताचा दाखला देत NOTA वर गरजले मोहन भागवत, मतदान देत काय केले आवाहन?

पळ काढण्याऐवजी संघर्षाची भूमिका सकारात्मक

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भागवत म्हणाले की, “यावेळी एक सकारात्मक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे हिंदूंनी तिथून पळून येण्याऐवजी तिथेच थांबून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा संघर्ष करायचा असतो, तेव्हा एकता महत्त्वाची असते. ते जितक्या लवकर एकत्र येतील, तितके त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी हिताचे ठरेल.”

२०४७ मध्ये विभाजनाची भीती नको, ‘अखंड भारता’चा विश्वास बाळगा

देशाच्या भविष्याबद्दल भाष्य करताना सरसंघचालकांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले, “२०४७ मध्ये भारताचे पुन्हा विभाजन होईल, अशी भीती बाळगण्यापेक्षा २०४७ मध्ये ‘अखंड भारता’च्या उदयाची कल्पना केली पाहिजे. या भूमीवर ५०० वर्षे राज्य करणाऱ्या सुलतानांना आणि २०० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना भारत तोडता आला नाही, तर आजच्या स्वतंत्र भारतात तसे पुन्हा का होईल? आजचा भारत १९४७ चा भारत राहिलेला नाही. भारताने आता मोठी प्रगती केली आहे. जे भारताला तोडण्याचा विचार करतील, ते स्वतःच संपून जातील. भारत एकसंध राहील आणि आम्ही ते करून दाखवू.”

बांगलादेशातील सद्यस्थिती

बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. छात्र नेता शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर तेथील स्थिती अधिकच चिघळली आहे. आगामी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका पार पडणार असून, त्यापूर्वी मोहन भागवत यांनी दिलेला हा संदेश जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Web Title: Rss chief mohan bhagwat makes a major statement on bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Bangladesh
  • mohan bhagwat
  • Mumbai
  • RSS

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
3

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा
4

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.