Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; वाचा… आज बाजारात नेमके काय घडले!

आज शेअर बाजारात बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 239.38 अंकांनी वाढून, 77,578.38 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 64.70 अंकांनी वाढून 23,518.50 वर बंद झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 19, 2024 | 08:18 PM
'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत

'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत

Follow Us
Follow Us:

सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर आज 19 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार वधारून बंद झाला. मात्र, शेवटच्या तासात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 1,100 अंकांपेक्षा जास्त उसळी घेतली होती. मात्र, नंतर सेन्सेक्स झपाट्याने घसरला आणि शेवटी 239 अंकांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीनेही शेवटच्या तासात आपला बहुतांश फायदा गमावला. परंतु निर्देशांक 23,500 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला. त्यामुळे बीएसईवरील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 1.31 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

हे देखील वाचा – मनबा फायनान्सचा पिज्यॉ व्‍हेईक्लस सोबत सामंजस्य करार; वाहन खरेदीदारांना फायदा मिळणार

सेन्सेक्समध्ये 239.38 अंकांनी वाढ

आजच्या व्यवहारादरम्यान रिॲल्टी, ऑटो आणि सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. धातू आणि तेल आणि वायू शेअर्समध्ये विक्रीचा कल दिसून आला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांक सुमारे 0.9 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 239.38 अंकांनी वाढून 77,578.38 वर बंद झाला. तर निफ्टी 64.70 अंकांनी वाढून 23,518.50 वर बंद झाला.

हे देखील वाचा – व्हिजन 2030 ग्रोथ स्‍ट्रॅटेजीसाठी रिलायन्‍स ग्रुपकडून ‘रिलायन्‍स ग्रुप कॉर्पोरेट सेंटर’ची स्‍थापना

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.31 लाख कोटींची वाढ

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 19 नोव्हेंबर रोजी 430.39 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी 429.08 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.31 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.31 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

हे देखील वाचा – स्टेट बँक ऑफ इंडिया साजरा करतेय प्रतिष्ठित हॉर्निमन सर्कल शाखेचा शतकोत्तर वारसा!

कोणते शेअर्स वधारले

बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स आज वधारले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक 3.55 टक्क्यांनी वाढले. यानंतर एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, सन फार्मा आणि टायटनचे शेअर्स 1.58 ते 2.21 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर सेन्सेक्समधील उर्वरित 13 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 1.53 टक्क्यांनी घसरून सर्वाधिक घसरले. तर स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि मारुती सुझुकी यांचे सेन्सेक्स 1.13 ते 1.44 टक्क्यांनी घसरले.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: The stock market recovered after 7 consecutive days of decline what exactly happened in the market today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 08:18 PM

Topics:  

  • sensex today
  • share market
  • Share Market Closing

संबंधित बातम्या

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर
1

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! कोणते शेअर्स देऊ शकतात कमाई करण्याची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! कोणते शेअर्स देऊ शकतात कमाई करण्याची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Stock Tips : 4 दिवसांत 40% रिटर्न! ‘या’ मल्टिबॅगर शेअरवर ब्रोकरेजचा मोठा विश्वास
3

Stock Tips : 4 दिवसांत 40% रिटर्न! ‘या’ मल्टिबॅगर शेअरवर ब्रोकरेजचा मोठा विश्वास

Share Market: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा झटका! ‘LTCG टॅक्स हटवण्याचा विचार नाही’; सरकारने स्पष्ट केलं चित्र
4

Share Market: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा झटका! ‘LTCG टॅक्स हटवण्याचा विचार नाही’; सरकारने स्पष्ट केलं चित्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.