फोटो सौजन्य - Social Media
यंदाचा येता सोमवार शेअर मार्केटसाठी फार महत्वाचा असणार आहे. सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष सोमवारी लिस्टिंग होणाऱ्या ३ IPO कडे आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या बातमीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच सगळे येत्या सोमवारी मार्केट खुले होण्याची प्रतीक्षा करत आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO येत्या सोमवारी लिस्टिंग होणार आहे. त्याचबरोबर आणखीन २ IPO चीही नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) तसेच बॉंबे स्टॉक एक्सचेंज (BSE)द्वारे लिस्टिंग केली जाणार आहे. दरम्यान, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO चा साईज ६,५६० कोटी रुपये इतका आहे. तसेच हा IPO ६८ पटीने वाढून अखेर बंद झाला आहे. येत्या सोमवारी शेअर बाजारात या तसेच आणखीन २ IPO ची लिस्टिंग होणार आहे, त्यामुळे सगळ्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.
हे देखील वाचा : भारतातील श्रीमंत गुंतवणूकदार; ‘या’ कंपनीमध्ये करतात गुंतवणूक
बजाज हाऊसिंग फायनान्स या IPO चा सोमवारी, १६ सप्टेंबर रोजी लिस्टिंग केले जाणार आहे. या IPO च्या माध्यमातून बजाज ग्रुप्सने ६,५६० कोटी जमवण्याचा निर्धार केला आहे. यातुन येणाऱ्या नफा कंपनी तिचा भांडवल आणखीन मजबूत करण्यावर लक्ष देणार आहे. महत्वाचे म्हणजे यातील ३,५६० कोटी फ्रेश इश्यू म्हणून जारी केले गेले आहेत. ऑफर फॉर सेलच्या अंतर्गत ३,००० कोटी रुपये जारी केले गेले होते. विशेष म्हणजे कंपनीने शेअर्सचा प्राईज ६६ रुपये ते ७० रुपयांच्या दरम्यान ठेवले आहे.
टॉलिन्स टायर्सचा IPO ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरच्या दरम्यान खुले करण्यात आले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे या IPO ची लिस्टिंगही सोमवारी, १६ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. IPO मध्ये कंपनीची किमंत बँड २१५ रुपये ते २२६ रुपये ठरवली होती. या IPO चा साईज २३० कोटी रुपये इतके असून २०० कोटी रूपये फ्रेश शेअर कंपनीने जाहीर केले होते. त्याचबरोबर, ३० कोटी शेअर ऑफर फॉर सेलच्या अंतर्गत जाहीर केले होते.
हे देखील वाचा : अवघ्या 20 रुपयांच्या गुंतवणूकीतून बनाल करोडपती, जाणून घ्या ‘हा’ फॉर्म्युला
क्रॉस लिमिटेड आईपीओ ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरच्या दरम्यान खुले करण्यात आले होते. वरील २ लिस्टिंगसह या IPOची लिस्टिंगही सोमवारी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी करण्याचे योजिले आहे. या IPO चा प्राईस बँड २२८ रुपयांपासून ते २४० रुपयांच्या दरम्यान ठेवले गेले होते. या IPO मध्ये २५० कोटी रुपयांचे फ्रेश शेअर तर २५० कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जाहीर करण्यात आले होते.