Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War : जगात युद्धाचा हाहाकार, मात्र TATAचा ‘हा’ शेअर नॉन-स्टॉप! 3 दिवसांत 60% टक्क्यांनी वाढला

शेअर बाजारात सध्या रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावामुळे मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. मात्र, या जागतिक दबावाचा TATA समूहाच्या या शेअरवर परिणाम झाला नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 02, 2026 | 07:22 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • Iran-Israel War : जगात युद्धाचा हाहाकार
  • ‘या’ शेअरवर कोणताही परिणाम नाही
  • तेजीचे मुख्य कारण काय?
Iran-Israel War : शेअर बाजारात सध्या रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावामुळे मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. मात्र, या जागतिक दबावाचा TATA समूहाच्या ‘तेजस नेटवर्क्स’ (Tejas Networks) या शेअरवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट, हा शेअर दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. सोमवारी बाजार सुरू होताच या शेअरमध्ये 13 टक्क्यांची मोठी वाढ होऊन तो 492 रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे, मागील केवळ तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरने 58 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या परिस्थितीत हा परतावा बराच मोठा  परतावा मानला जात आहे.

Russia Stock Market Rally : युद्धामुळे जगभरात हाहाकार…, मात्र ‘या’ देशाचा शेअर बाजारात मोठा चौकार

शेअरच्या किमतीतील वादळी झेप

गेल्या तीन दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास या शेअरची ताकद लक्षात येते. हा प्रवास साधारण 315 रुपयांवरून सुरू होऊन अवघ्या तीन दिवसांत 490 रुपयांचा टप्पा पार गेला आहे.  शुक्रवारी जागतिक दबावामुळे बाजार कोसळत असताना या शेअरने 17 टक्क्यांची भरारी घेतली. सोमवारी पुन्हा 13 टक्क्यांची वाढ नोंदवत शेअर 502रुपयांच्या इंट्राडे हायवर पोहोचला. एका आठवड्यात 50%, तर एका महिन्यात या शेअरने 42% परतावा दिला आहे.

 या तेजीचे मुख्य कारण काय?

तेजस नेटवर्क्सच्या शेअरमध्ये आलेल्या या तुफानी तेजीमागे एक मोठी व्यावसायिक घोषणा आहे. TATAच्या या कंपनीने NEC कॉर्पोरेशनसोबत एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक करार केला आहे. या करारानुसार, तेजस नेटवर्क्स ‘5G मॅसिव्ह MIMO’ (Multiple Input Multiple Output) रेडिओ तंत्रज्ञानाची निर्मिती आणि पुरवठा करणार आहे.

MIMO तंत्रज्ञान नक्की काय आहे? 5G मॅसिव्ह MIMO हे प्रगत रेडिओ तंत्रज्ञान आहे. यात हाय-कॅपॅसिटी बेस स्टेशन अँटेना वापरले जातात, जे शेकडो लहान घटकांच्या मदतीने ‘बीमफॉर्मिंग’ करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना विनाव्यत्यय इंटरनेट आणि अतिवेगवान डेटाचा अनुभव मिळतो. या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे, ज्याचा थेट फायदा तेजस नेटवर्क्सला होणार आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील कल

तेजस नेटवर्क्सचे सध्याचे बाजार भांडवल 7736 कोटी रुपये आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा नीचांक 294 रुपये होता, तर उच्चांक 914 रुपयांपर्यंत गेला आहे. TATA समूहाने या कंपनीत गुंतवणूक केल्यापासून कंपनीच्या तांत्रिक क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. भारताच्या स्वदेशी 5जी (Indigenous 5G) मोहिमेत तेजस नेटवर्क्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा एक पसंतीचा स्टॉक ठरत आहे.

Iran Israel War : ज्याची भीती होती तेच झालं! महागाईला निमित्त…; सौदी अरेबियाच्या सर्वात मोठ्या तेल कंपनीने थांबवले उत्पादन

Web Title: Israel iran war why tata stocks zoom 60 percent in three days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Bombay Stock Exchange
  • Iran-Israel War
  • Saudi Arabia
  • share market
  • Stock market news
  • Tata

संबंधित बातम्या

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
1

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
2

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
3

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई
4

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.