Jio BlackRock Partnership: भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात खळबळ! अंबानी–फिंक यांच्या भागीदारीला सेबीची मान्यता (फोटो-सोशल मीडिया)
Jio BlackRock Partnership: अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर कॉर्पोरेट जगात काही करार हे बंद दाराआड अंतिम केले जातात. मात्र, भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ब्लॅकरॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांच्यातील ही ऐतिहासिक युती एका छोट्या कार राईड दरम्यान झाली. या छोट्या कार राईडमुळे गुंतवणूक क्षेत्रात क्रांति झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आणि लॅरी फिंक एकाच कारमध्ये प्रवास करत असताना अंबानींनी फिंक यांना एक साधा प्रश्न विचारला की, “तुम्हाला भारतात आमच्यासोबत काहीतरी मोठे करायचे आहे का?” लॅरी फिंक यांचे सकारात्मक उत्तर आले. आणि त्यामुळे गुंतवणूक क्षेत्रात जिओ ब्लॅकरॉकचा पाया रचला गेला. या बैठकीमुळे रिलायन्सचा डिजिटल साम्राज्य आणि जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापक ब्लॅकरॉक यांच्यात ५०:५० असा संयुक्त उपक्रम झाला, ज्यामध्ये प्रत्येकी १५० दशलक्ष डॉलर्सची प्रारंभिक गुंतवणूक होती.
UPI Now Pay Later: NPCI चा नवा धमाका! आता आधी पेमेंट, नंतर परतफेड करा; UPI मध्ये ‘ही’ सुविधा सुरू
जिओ ब्लॅकरॉक या भागीदारीचे मुख्य ध्येय हे भारताच्या गुंतवणूक बाजारपेठेत ‘डिजिटल-फर्स्ट’ दृष्टिकोन आणणे असून यामुळे गुंतवणूक क्षेत्राला वेग येईल. तसेच परवडणारी गुंतवणूक म्हणून याकडे पहिले जाईल. म्हणजेच, ब्लॅकरॉकच्या जागतिक कौशल्याद्वारे आणि रिलायन्सच्या डिजिटलद्वारे भारतीय गुंतवणूकदारांना कमी किमतीचे गुंतवणूक पर्याय प्रदान केले जातील. पारंपारिक म्युच्युअल फंड अद्याप पोहोचलेले नसलेल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुंतवणूक पर्याय पोहोवणे हा देखील याचे महत्वाचे उद्दिष्ट असेल.
PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४,००० रुपये खात्यात जमा होणार, कसं ते जाणून घ्या…
जिओच्या विशाल नेटवर्कचा आणि ब्लॅकरॉकच्या गुंतवणूक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन चांगला गुंतवणूकदार अनुभव प्रदान करण्याचा हेतु असल्याचे सांगितले आहे. या भागीदारीचा बाजारात सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिओ ब्लॅकरॉकला अलीकडेच त्यांच्या म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीकडून मान्यता मिळाली आहे. ही युती केवळ भारतातील विद्यमान म्युच्युअल फंडांना आव्हान देत नाही तर दोन जागतिक दिग्गज कंपन्या केवळ विश्वास आणि समान दृष्टिकोनावर काही मिनिटांत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात.






