
Stock Market Today: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि भारती एअरटेलसह आज या स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांचे लक्ष, वाचा सविस्तर
मंगळवारी, भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,३०० च्या खाली घसरला. सेन्सेक्स १,०६५.७१ अंकांनी किंवा १.२८% ने घसरून ८२,१८०.४७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३५३.०० अंकांनी किंवा १.३८% ने घसरून २५,२३२.५० वर बंद झाला. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी एकूण ५ स्टॉक्सची शिफारस केली आहे. बाजारातील तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या स्टॉक्समध्ये स्टॉक निवडींमध्ये हिंदुस्तान झिंक, व्हीआरएल लॉजिस्टिक्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना पाच ब्रेकआउट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सुमीत बगडिया यांनी सुचवलेल्या शेअर्समध्ये जिंदाल एसएडब्ल्यू, दीपक नायट्रेट, जीपीपीएल, जेके लक्ष्मी सिमेंट आणि डालमिया भारत यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज व्यवहार करताना गुंतवणूकदारांना तीन स्टॉक खरेदी करण्याती शिफारस केली आहे, ज्यामध्ये आयन एक्सचेंज इंडिया, टीबीझेड आणि ईपीएल यांचा समावेश आहे.
सोने आणि चांदी नेहमी गुलाबी कागदात का दिलं जात? 99 टक्के लोकांना माहित नसेल त्यामागचं कारण
५० हून अधिक कंपन्या आज त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. बीएसईच्या निकालांच्या कॅलेंडरनुसार, आज, २१ जानेवारी २०२६ रोजी, ५७ कंपन्या आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीचे त्यांचे आर्थिक उत्पन्न जाहीर करतील. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, इंटरनल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( एचपीसीएल ), बजाज कंझ्युमर केअर, बँक ऑफ इंडिया, कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, जिंदाल स्टेनलेस, केईआय इंडस्ट्रीज आणि यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी या प्रमुख कंपन्या आज त्यांचे तिसरे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.